पुण्यानंतर सोलापूर हादरलं… आणखी एका वैष्णवीने उचललं टोकाचं पाऊल, कार, पैसा आणि….

सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 22 वर्षीय आशाराणी भोसले यांनी हुंड्याच्या मागणीमुळे गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याने व सासरच्यांनी सातत्याने पैशाची आणि कारची मागणी केली होती. तिच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पती, सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यानंतर सोलापूर हादरलं... आणखी एका वैष्णवीने उचललं टोकाचं पाऊल, कार, पैसा आणि....
सोलापुरात एका विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 10:49 AM

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे. केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवावं लागल्याचं समोर येत आहे. तर, वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच सोलापुरातील आणखी एका प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. सोलापुरात एका विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी या गावात आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेने आपलं आयुष्य संपवलं आहे. नवरा आणि सासूकडून सातत्याने कार आणि पैशाची मागणी केली जात होती. त्यासाठी तिचा छळ केला जात होता. त्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादित म्हटलं आहे. पोलिसांनी आशाराणीच्या नवऱ्यासह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्यांदा गर्भवती

सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेचं मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद आहे. काल मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या.

2019 साली आशाराणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता. तर दुसरी मुलगी उषाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला होता. मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करतं होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते, असा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे.

समुपदेशनानंतरही छळ सुरूच

2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं . त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती-पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देने सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.