मालेगावात भरदिवसा ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, थरार पाहून पोलिसही चक्रावले…

नाशिकच्या मालेगाव येथे भरदिवसा ज्वेलर्सला धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मालेगावसह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मालेगावात भरदिवसा ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद,  थरार पाहून पोलिसही चक्रावले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 11:20 AM

मालेगाव ( नाशिक ) : नाशिकच्या मालेगावात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे दिवसाधवळ्या लूटमारीच्या घटना घडत आहे. मालेगाव येथील सटाणानाका भागातील सराफ व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयितांकडून एक लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक थोरात यांनी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. थोरात हे आपल्या मंगलमूर्ती ज्वेलर्स या दालनात बसले असतांना कारमधून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितली.

दरम्यान, थोरात यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे संशयितांनी कंबरेला बंदूक असल्याचे भासवत त्यांना धमदाटी केली. यामुळे थोरात यांनी पैसे आणून देतो, असे सांगितल्याने संशयितांनी थोरात यांना वारंवार फोन करुन पैशांची मागणी सुरु आहे.

सराफ व्यावसायिकाकडे खंडणीसाठी तगादा सुरु झाल्याने शहरातील सराफ व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीवरुन छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोजणे तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

मालेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. हल्ल्याच्या घटनाही वाढत असून त्यामुळे पोलिसांचा धाक शिल्लक राहिला की नाही असा सवाल काही नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामध्ये रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही नागरिक करीत आहे.

ज्वेलर्सला धमकावून खंडणी मागीतल्याने संशयित गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत गेली आहे याचा अंदाज येईल. चारचाकी मध्ये बसून येतात बिनधास्त दमदाटी करतात यामुळे ज्वेलर्सच्या दुकांदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली असून कारवाईची मागणी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.