वीज चोरी उघड केल्यानं ग्राहक संतापला, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यासोबत जे घडलं ते भयंकरच, अखेर पोलिसांत गुन्हा दाखल…

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली घटना ताजी असतांना खाजगी वीज चोरीबाबतचा धक्कादायक प्रकार समोर आला असून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज चोरी उघड केल्यानं ग्राहक संतापला, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यासोबत जे घडलं ते भयंकरच, अखेर पोलिसांत गुन्हा दाखल...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 11:04 AM

नाशिक : नाशिकच्या मालेगावमध्ये महावितरणच्या वसूली पथकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतांना छावणी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. एमपीएसएलच्या भरारी पथकाने ग्राहकाकडून केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या वीज चोरीचा भांडाफोड केला होता. ग्राहक हा एका कारखान्याचा मालक आहे. वीज चोरी पकडल्याने आणि लाखो रुपयांचा दंड भरवा लागेल या भीतीने भडकला आणि त्याने एमपीएसएलच्या भरारी पथकावर थेट हल्लाच केला. इथवरच हे प्रकरण थांबले नाही टयांनी थेट वीज कार्यालयात घुसून मारहाण केली. वीज चोरीच्या बाबत जी फाइल होती ती घेऊनच तिथून वीज ग्राहक आणि त्याचा साथीदार फरार झाला.

छावणी पोलिस ठाण्यात याबाबत एमपीएसएलच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत तक्रार दिली होती. त्यावरून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात छावणी पोलिसांनी मात्र दोघांना अटक केली इतर संशयित आरोपी फरार आहे.

यामध्ये रियाज भिक्कू व साजिद खान यानं अटक करण्यात आली आहे. 16 मार्चला ही संपूर्ण घटना घडली होती. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल झाला असून छावणी पोलिस याबाबत अधिकचा तपास करीत आहे.

हे सुद्धा वाचा

एमपीएसएलच्या भरारी पथकाने ग्राहक मलिद जैद अमिन यांच्या कारखान्यावर फेब्रुवारी महिण्यात वीज चोरी प्रकरणी छापा टाकला होता. त्यात लाखो रुपयांची वीज चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. ही चोरी पकडल्याने अधिकाऱ्यांच्या बद्दल ग्राहकाच्या मनात राग निर्माण झाला होता.

संशयित मलीक जैदसह अब्दुल अजीज, रियाज भिक्कू, साजिद खान, जुल्फीकार आणि इतर संशयितांनी वीज कार्यालयाची तोडफोड केली. फाइलसह घेऊन पोबारा करत असतांना अधिकाऱ्यांना मारहाणही केली आहे.

यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 35 लाखाहून अधिक किमितीची वीज चोरी केल्याची प्रथमदर्शनी समोर आले असून त्याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये वीज वसूली करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.