AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यावसायिक नुकसानीमुळे दररोज वाद होत होते, मुलं आईला धीर द्यायची, मग संतापलेल्या पित्याने…

व्यवसायात नुकसान झाल्याने तो टेन्शनमध्ये होता. यातून तो दररोज पत्नीशा भांडायचा. मुलांना आईची अवस्था पाहवत नव्हती. त्यामुळे ती आईला धीर द्यायची. पण हीच गोष्ट त्याला खटकायची.

व्यावसायिक नुकसानीमुळे दररोज वाद होत होते, मुलं आईला धीर द्यायची, मग संतापलेल्या पित्याने...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 28, 2023 | 5:36 PM
Share

दिल्ली : व्यवसायातील नुकसानीमुळे पत्नी दररोज भांडण करायची आणि मुलंही तिला साथ द्यायची. यामुळे संतापलेल्या प्रॉपर्टी डिलरने पत्नी आणि दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील नेब सराई भागात ही घटना घडली. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीला नेब सराई पोलिसांनी अटक केली आहे. विजयवीर असे आरोपीचे नाव आहे. सुमन असे मयत पत्नीचे, शंशाक मुलाचे आणि देविका मुलीचे नाव आहे.

पती दररोज पत्नीशी भांडण करायचा

विजय हा प्रॉपर्टी डिलर आहे. त्याला त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. यामुळे घरात दररोज भांडण होत होते. तसेच विजय पत्नीला अनेकदा मारहाणही करायचा. यावेळी मुलं आईला धीर द्यायची. यामुळे विजयने पत्नी आणि मुलांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार त्याने गुरुवारी सकाळी झोपेत असलेल्या पत्नीवर हल्ला केला. यात पत्नी सुमनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो मुलांच्या खोलीत गेला आणि त्यांच्यावर वार करुन लागला. पण मुलांना जाग आणि त्यांनी त्याच्या हातातून शस्त्र हिसकावून घेतले.

यानंतर मुलीने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांची सुटका करत रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाहून आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

याआधीही केला कुटुंबीयांवर हल्ला

विजयवीरने याआधी 2017 मध्ये कुटुंबीयांवर हल्ला केला होता. पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नीला होता. यातून दोघांमध्ये भांडण झाले आणि या भांडणातून त्याने पत्नी आणि मुलांवर गोळीबार केला होता. यावेळी मुलाला गोळी लागली होती. तर पत्नी आणि मुलगी बचावल्या होत्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?