AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकरीवरून सुरू झालेला वाद पेटला, त्याने शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच…

बकरीवरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. बघता बघता ते भांडण चांगलच पेटलं आणि संतापाच्या भरात...

बकरीवरून सुरू झालेला वाद पेटला, त्याने शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच...
| Updated on: Aug 29, 2023 | 2:44 PM
Share

लखनऊ| 29 ऑगस्ट 2023 : संतापाच्या भरात माणूस अशी एखादी कृती करतो, ज्यामुळे त्याला नंतर जन्मभर पश्चाताप करावा लागतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथे घडली आहे. तेथे एका इसमाने रागाच्या भरात त्याच्या शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच (cut private part) कापला. खरंतर दोघांमध्येही बकरीवरून भांडण (dispute over goats) सुरू होते. बघता-बघता ते एवढे वाढले की त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि संतापाच्या भरात त्या इसमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या इसमाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित इसम हा 31 वर्षांचा असून आरोपी हा 28 वर्षांचा आहे. शेजाऱ्याची बकरी आरोपीच्या शेतात घुसली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. यामुळे आरोपी अतिशय नाराज झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला. पीडित इसमाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित इसमाचा प्रायव्हेट पार्ट कापल्यावर तो बेशुद्ध झाला. त्याला तसेच तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाकेही घालण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरोधात दोघांनी तक्रार दाखल केली आहे.

धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि कापला प्रायव्हेट पार्ट

याप्रकरणी पीडित इसमाने (बकऱ्यांचा मालक) दिलेल्या जबानीनुसार, बकऱ्यांमुळे त्याचे शेजारी राहणाऱ्या गंगाराम याच्याशी भांडण झाले. तेव्हा आरोपीने त्याला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर पीडित इसम बेशुद्ध झाला. मला अतिशय वेदना होत असून त्या सहन करणे कठीण आहे. या गोष्टीमुळे माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती मला वाटत आहे, असेही तो म्हणाला.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत