AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही … क्षणार्धात 4 जीव शांत !

Man Killled Family In Udaipur : उदयपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तेथे राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रथम आपल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं?

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही ... क्षणार्धात 4 जीव शांत !
| Updated on: Jul 26, 2025 | 9:28 AM
Share

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका पीनते पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करून सर्वस्व संपवले. या भयानक घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पतीने प्रथम पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून ती वाचल्यावकर पोलिसदेखील सुन्न झाले. ही घटना हिरणमग्री पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगर येथील आहे. सुसाईड नोटमध्ये त्या इसमाने आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद केले होते. मी आधीच त्रासात आहे. आता आमच्याकडे कोणताही मार्ग नाही, असं त्याने नोटमध्ये लिहीलं होतं. अशाप्रकारे एक हसतं खेलतं, आनंदी कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय दिलीप चितारा हे त्यांच्या कुटुंबासह अंबाफळा हॉल प्रभातनगर सेक्टर-5 मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अलका (वय 37), मुलगा खुश (वय 6) आणि मनवीर (वय 4) रहात होते. दिलीपने प्रथम मुलांना विष दिले, पत्नीचा गळा दाबला आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. माहिती मिळताच हिरणमग्री पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र समोरचदिलीप चितारा यांचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्यांच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह तिथे पडले होते, समोरील दृश्य पाहून लोकांन धक्काच बसला. पोलिसांनी मृतदेह शवागारात पाठवले व त्यानंतर मृताच्या कुटुंबियांना माहिती दिली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहीलं ?

दिलीपने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, (त्याची) आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली. म्हणूनच तो हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने नमूद केलं. दिलीपचे हिरणमग्री येथे एक जनरल स्टोअर होते. हे दुकानही भाड्याने घेतले होते असं पोलिसांनी सांगिीतलं.

घरमालकाला आली शंका

शुक्रवारी दिवसभर भाडेकरू दिलीपच्या घराच्या कोणतीही हालचाल झाली नाही. कोणीही बाहेर न आल्याने पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले.

नातेवाईकांनी सांगितलं कारण

मृताचे काका मानक चितारा म्हणाले की, सुमारे 6 महिन्यांपूर्वी दिलीपने कर्जाबद्दल सांगितले होते. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांना घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी कधीही यावर चर्चा केली नाही. अलिकडेच काका दिलीपला भेटले, पण त्यांनी कर्जाचा उल्लेख केला नाही.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा