अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेतला, आणखी कारवाईही केली, पोलिसाविरोधात बंड, थेट आत्महत्या

| Updated on: Jun 25, 2021 | 9:32 PM

अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता देऊनही पोलिसांनी कारवाई केली म्हणून एका व्यक्तीने आज विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे (Man suicide after police action against sand illegal transport in Pandharpur).

अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेतला, आणखी कारवाईही केली, पोलिसाविरोधात बंड, थेट आत्महत्या
अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेतला, आणखी कारवाईही केली, पोलिसाविरोधात बंड, थेट आत्महत्या
Follow us on

पंढरपूर (सोलापूर) :‌ अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता देऊनही पोलिसांनी कारवाई केली म्हणून एका व्यक्तीने आज विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही पंढरपूर तालुक्यातील‌ सरकोली गावात शुक्रवारी (25 जून) दुपारी घडली. संबंधित हप्तेखोर पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतकाचे प्रेत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन समोर ठेवले आहे (Man suicide after police action against sand illegal transport in Pandharpur).

या घटनेमुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली उडाली आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणावर सावध भूमिका घेतली आहे. मृतकाकडून हप्ते घेणाऱ्या पोलिसांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितलं आहे (Man suicide after police action against sand illegal transport in Pandharpur).

मृतकाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

भीमा नदीपात्रातून राजरोसपणे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. असाच प्रकार सरकोली गावामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथील सोमनाथ भालके ही व्यक्ती अवैध वाळू वाहतूक आणि उपसा करत असल्याने पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी मयत व्यक्तीकडून वारंवार हप्ते घेऊन पुन्हा आज कारवाई केल्याने सोमनाथ भालके ‌याने आत्महत्या केली, असा आरोप मृतकाचा भाऊ आबा भालके यांनी केला आहे.

संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करा, नातेवाईकांची मागणी

संबंधित पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे प्रेत तालुका पोलीस स्टेशन समोर ठेवले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

दोन जण ग्राहक बनून दुकानात आले, दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं, नंतर चाकू हल्ला, कपड्याच्या दुकानात थरार