दोन जण ग्राहक बनून दुकानात आले, दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं, नंतर चाकू हल्ला, कपड्याच्या दुकानात थरार

नालासोपाऱ्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. वसईत एका कापड व्यापाऱ्यावर अज्ञात आरोपींनी भर दिवसा चाकूचा हल्ला केला (two youth attack on cloth trader in Nalasopara).

दोन जण ग्राहक बनून दुकानात आले, दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं, नंतर चाकू हल्ला, कपड्याच्या दुकानात थरार
प्रातिनिधिक फोटो

नालासोपारा : नालासोपाऱ्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. वसईत एका कापड व्यापाऱ्यावर अज्ञात आरोपींनी भर दिवसा चाकूचा हल्ला केला. हल्ला करुन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे ही घटना भर दिवसा घडली आहे. या हल्ल्यात व्यापाऱ्याच्या गळ्याला चाकू लागला असून तो जखमी झाला आहे. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना ही गुरुवारी (24 जून) दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली (two youth attack on cloth trader in Nalasopara).

नेमकं प्रकरण काय?

वसई पश्चिमेकडील माणिकपूर रोडवर किलर NX नावाचं हे दुकान आहे. दुकानमालक कांतिलाल शहा हे गुरुवारी दुपारी दोन वाजता दुकानात बसले असताना दोन जण ग्राहक बनून आले. त्यांनी कपडे दाखवण्याच्या बहाण्याने कांतिलाल यांना बोलण्यात गुंतवलं. कपडे दाखवत असताना अचानक दोघांनी कांतिलाल यांच्यावर चाकुचा हल्ला केला. त्यानंतर आरोपी फरार झाले. यात कांतिलाल हे जखमी झाले आहेत. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भर दिवसा ही घटना घडल्याने इतर व्यापाऱ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे (two youth attack on cloth trader in Nalasopara).

पोलिसांचा तपास सुरु

हल्लेखोरांना पोलिसांची भीती नाही का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जातोय. दरम्यान, संबंधित घटनेनंतर कांतिलाल शहा यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार करण्यात आला. त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करण्याची शक्यता आहे. तसेच आरोपींच्या अटकेनंतरच या हल्ल्यामागचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारला कोट्यवधींचा चुना लावणारा ULC घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सापडला, सूरतमधून बेड्या

बँक मॅनेजर खातेदारांची माहिती द्यायचा, त्याचे सहकारी एटीएम क्लोन करुन पैसे चोरायचे, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI