ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द

अनिश बेंद्रे

Updated on: Mar 20, 2021 | 2:10 PM

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला आहे (Mansukh Hiren death case NIA)

ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द
mansukh hiren

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे. (Mansukh Hiren death case taken over by NIA)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएसकडून तपास

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) केला जात होता. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) देण्याची मागणी विरोधीपक्षाकडून वारंवार केली जात होती.

एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.

ATS कडून कसून चौकशी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु होती मनसुख हिरेन यांचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची टीम आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी ठाणे एटीएस कार्यालयात जाऊन तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!

अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?

(Mansukh Hiren death case taken over by NIA)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI