मला लाथ मारून हाकलण्याचा… NCP च्या आणखी एका नेत्याने खंत बोलून दाखवली, भर मंचावरून धनंजय मुंडे पुढे काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील पक्षांतर्गत घडमोडींना सध्या वेगळंच वळण आलं आहे.. अलीकडेच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची गुप्त बैठक झाली, नंतर सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीने सगळ्यांच्या नजरा वळवल्या. आता पुन्हा NCP नेत्याने जनतेसमोर मनोगत मांडले आहे. राष्ट्रवादीतील नेते धनंजय मुंडे यांनी मराठा भवनासंबंधित कार्यक्रमात परळीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक बोचरी खंत बोलून दाखवली.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘जे काही आहे ते समोर आहे. ताकाला जाऊन भांडं लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे, जे ओठावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेल्या ॲग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या पन्नास वर्षांचा अंदाज घेऊन केले जात आहे, त्याच पद्धतीचे हे मराठा भवन असणार आहे.’
‘याआधी अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्याव्या लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं,’ असेही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनोगत मांडले. ते म्हणाले, ‘मधल्या दोन-तीन वर्षात जे काय झालं, त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जात-पात धर्म सोडून राजकारण केले आहे, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला,’ असं विधान आमदार धनंजय मुंडे यांनी केले.
Published on: May 16, 2026 11:29 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच