AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो 22 वर्षांचा, ती 35 वर्षांची विवाहित, काकांसोबत सेक्सवरुन दोघांचं वाजलं अन् मग..

"मृत महिला मंगोलपुरी येथेच राहणारी आहे. धुण्याभांड्याचं काम करते. ती विवाहित असून तीन मुलांची आई आहे" अशी माहिती सह पोलीस आयुक्त जतीन नारवाल यांनी दिली.

तो 22 वर्षांचा, ती 35 वर्षांची विवाहित, काकांसोबत सेक्सवरुन दोघांचं वाजलं अन् मग..
physical tiesImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 12:19 PM
Share

एका 22 वर्षीय मुलाने 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह डबल बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला. हा मुलगा पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. दिल्लीच्या मंगोलपुरी येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलगा आणि महिला या दोघांच्या वयात 13 वर्षांचं अंतर असलं तरी त्यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपी मुलगा त्यांचे 50 वर्षीय काका आणि या काकांचा 52 वर्षांचा मित्र या तिघांना या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कारण या तिघांनी मिळून हा खून केला. काकांसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी मुलगा या महिलेच्या मागे लागला होता. पण महिला त्याला नकार देत होती. त्याचं रागातून त्याने महिलेची हत्या केली.

“आरोपीने महिलेला जमिनीवर पाडलं. खाली पडल्यानंतर कपाळाला मार लागला. आरोपीने ब्लँकेटने तिचा गळा आवळला. तिचा श्वास कोंडला गेल्याने मृत्यू झाला. त्याने बेड बॉक्समध्ये तिचा मृतदेह भरला. मित्रासोबत हा मुलगा पीजीमध्ये राहतो. तिथेच ही गुन्ह्याची घटना घडली. मुलाचे काका आणि त्यांचा मित्र रुम बाहेर पहारा देत उभे होते. नंतर त्याला पळून जायला मदत केली” असं तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सातच्या सुमारास फोन कॉल आला

पत्थर मार्केटमध्ये एका इमारतीत रुमच्या बेड बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे असं मंगोलपुरी पोलीस स्टेशनला मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास फोन कॉल आला अशी माहिती पोलीस उपायुक्त विक्रम सिंह यांनी दिली. पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली.

तीन मुलांची आई

पीजी मालक संध्याकाळी सातच्या सुमारास घरी आला तेव्हा रुम उघडी होती. आरोपी तिथे नव्हता. खोलीत प्रवेश केल्यानंतर बेड बॉक्समधून एक पाय बाहेर असल्याचं दिसलं. त्याने बेड बॉक्स उघडल्यानंतर त्यात महिलेचा मृतदेह होता. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. मृतदेहाच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. कपाळावर जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. “मृत महिला मंगोलपुरी येथेच राहणारी आहे. धुण्याभांड्याचं काम करते. ती विवाहित असून तीन मुलांची आई आहे” अशी माहिती सह पोलीस आयुक्त जतीन नारवाल यांनी दिली. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 103 आणि 238 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

4.30 च्या सुमारास दोघे खोलीत गेले

मृत महिलेचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचं तपासातून समोर आलय. आरोपीच मंगोलपुरी भागातच चिकन शॉप आहे. मंगळवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास दोघे खोलीत गेले. मुलाचे काका आणि मित्र तिथे पोहोचले. मुलगा तिला काकांसोबत शरीरसंबंध ठेवायला सांगत होता. पण तिने नकार दिला. म्हणून त्याने महिलेला खाली पाडलं व गळा आवळून तिची हत्या केली. तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...