Palghar Crime : आधी मैत्री कैली, मग महिलेवर वारंवार अत्याचार, नराधम एवढ्यावरच थांबला नाही पीडितेचा…

पालघरमध्येही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुले पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Palghar Crime : आधी मैत्री कैली, मग महिलेवर वारंवार अत्याचार, नराधम एवढ्यावरच थांबला नाही पीडितेचा...
पालघरमध्ये विवाहितेवर अत्याचार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2023 | 5:31 PM

पालघर / 22 ऑगस्ट 2023 : पालघरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. एका विवाहितेवर मित्रानेच वारंवार अत्याचार केल्याची धक्कदायक घटना पालघरमध्ये घडली आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही. बलात्काराची घटना मोबाईलमध्ये कैद केली. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी पोलिसांनी सोमवारी कलम 376(2)(एन) (एकाच महिलेवर वारंवार केलेला बलात्कार) आणि भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार महिलेच्या मित्रासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आधी पीडितेशी मैत्री केली, मग वारंवार बलात्कार

मुख्य आरोपीने आधी पीडित महिलेशी मैत्री केली. पीडित महिला विवाहित आहे. यानंतर आरोपीने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्कार करताना व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओबद्दल माहिती मिळाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.