खुशबू कासिम अहमदपासून…लॉजवर दोघांची पहिली भेट, मॉडल मृत्यू प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
या प्रकरणात खुशबूचा बॉयफ्रेंड कासिम अहमद पोलिसांच्या अटकेत आहे. कासिम पोलिसांना वारंवार हेच सांगतोय की, तो निर्दोष आहे. दोघे मागच्या दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

मॉडल खुशबू वर्मा संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय, दुसऱ्याबाजूला पोस्टमार्टम रिपोर्टमधून चक्रावून टाकणारी तथ्य समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, 27 वर्षाची खुशबू प्रेग्नेंट होती. तिची फॅलोपियन ट्यबू (गर्भाशय नळी) फुटली. डॉक्टरांनुसार, प्रेग्नेंसी कॉम्प्लिकेशन म्हणजे गर्भावस्थेशी संबंधित जटिलतेमुळे मृत्यू झालेला असू शकतो. पोलीस हत्येच्या अँगलने सुद्धा तपास करत आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील हे प्रकरण आहे.
या प्रकरणात खुशबूचा बॉयफ्रेंड कासिम अहमद पोलिसांच्या अटकेत आहे. कासिम पोलिसांना वारंवार हेच सांगतोय की, तो निर्दोष आहे. दोघे मागच्या दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. कासिमने पोलिसांना सांगितलं की, खुशबूची तब्येत बिघडल्यानंतर तो स्वत:ला तिला रुग्णालयात घेऊन गेला. खुशबूच्या नातेवाईकांनी त्याच्यावर मारहाण आणि हत्येचा आरोप केला आहे.
कशामुळे झाला मृत्यू?
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, खुशबू वर्मा प्रेग्नेंट होती. गर्भाशयाची नळी फाटल्याने इंटरनल ब्लिडिंगमुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली आणि मृत्यू झाला. रिपोर्टमध्ये कुठेही बाहेरील जखमांमुळे मृत्यू झाल्याची पुष्टि केलेली नाही. खुशबूच्या शरीरावर जखमांचे निशाण होते, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. तिची हत्या केल्याचा संशय आहे.
लॉजमध्ये पहिली भेट
खुशबूच्या गर्भात आपलच मुल होतं असा कासिमने पोलीस चौकशीत दावा केला. दोघांची भेट जवळपास दोन वर्षांपूर्वी एका लॉजमध्ये झालेली. त्यानंतर सोशल मीडियावर बोलणं सुरु झालं. ते लवकरच लग्न करणार होते. त्याने अलीकडेच आपल्या नातेवाईकांना याची कल्पना दिलेली. घटनेच्या रात्री कासिमने खुशबूच्या आईला फोन करुन सांगितलं की, खुशबूची तब्येत अचानक बिघडली आहे. तिचं शरीर आकडलय. मी तिला चिरायु हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोय असं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तिथे तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं.
खुशबूच्या मोबाइलवरुन ऑनलाइन व्यवहार
पोलीस चौकशीत हे सुद्धा समोर आलय की, कासिम आधी गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होता. बेकायद दारु तस्करी प्रकरणात तो तुरुंगात सुद्धा जाऊन आलय. त्याशिवाय खुशबूच्या मोबाइलवरुन ऑनलाइन व्यवहार करायचा. दोघांमध्ये पैशांवरुन वादही झालेला. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
