आई, मी विष घेतलंय, माझा मृतदेह घेऊन जा ! ऑडिओ रेकॉर्ड करून तरूणाने उचललं टोकाचं पाऊल, पुणं हादरलं

पुण्यात अवघ्या 18 वर्षांच्या तरूणाने टोकाचं पाऊल उचललं. मात्र त्यापूर्वी त्या तरूणाने एक ऑडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. त्यात त्याने आईसाठी मेसेज रेकॉर्ड करून ठेवला होता. त्या तरूणाच्या कृत्याने संपूर्ण पुणं हादरलं आहे.

आई, मी विष घेतलंय, माझा मृतदेह घेऊन जा ! ऑडिओ रेकॉर्ड करून तरूणाने उचललं टोकाचं पाऊल, पुणं हादरलं
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 23, 2025 | 9:36 AM

पुण्यातल एका 18 वर्षांच्या तरूणाने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवलं. त्याने आत्महत्या केल्याच उघड झाले आहे. मात्र आयुष्य संपवण्यापूर्वी त्या 18 वर्षांच्या तरूणाने एक ऑडिओ रेकॉर्डही केला होता. ” मम्मी, मी माझा मोबाईल फोडेन. कोणताही पुरावा मिळणार नाही. मला मरायचे आहे. मी विष प्राशन केले आहे. मी लोकेशन पाठवलं आहे, माझा मृतदेह घेऊन जा ” जीवाचा थरकाप उडवणारा असा मेसेज त्याने रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यानंतर त्याने त्याचं आयुष्य संपवलं. मात्र त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संजय विनोदकुमार राजपूत असे मृत तरूणाचे नाव असून त्याने हे आत्मघातकी पाऊल उचचल्याने संपूर्ण कुटुंबीय शोकाकुल आहेत.

याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. मृत संजय याने डिप्रेशन अर्थात नैराश्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. 17 जून रोजी देहू रोड पोलिस ठाण्यात संजय कुमार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर टेकडीच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळली. त्याने विषप्राशन करूनच आयुष्य संपवलं असं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही हेच नमूद करण्यात आलं आहे.

ऑनलइन विष मागवलं आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा संजय कुमार हा पिंपरी-चिंचवड परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याला आईवडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये संजयकुमार याने आपल्या बहिणींबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना उच्च शिक्षण द्यावं अशी विनंती त्याने पालकांना केली. तसेच त्याच्या आत्महत्येचा एक व्हिडीोही समोर आला असून त्यामध्ये संजय कुमार हा डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसत आहे.

आत्महत्या करणाऱ्या संजय कुमारने ऑनलाइन विषारी औषध मागवले होते अशी माहितीदेखील समोर आली आहे, त्यानंतरच त्याने हे पाऊल उचलले. त्याने आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची सध्या पोलस चौकशी करत आहेत. या हृदयग्रावक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.