सियापेक्षा खतरनाक! आधी गच्चीवरुन ढकललं, नंतर थेट सलाईनमध्येत टॉयलेट क्लिनर टाकलं

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची भयानक कट रचून हत्या केली. पोलिसांना जेव्हा हे प्रकरण कळाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

सियापेक्षा खतरनाक! आधी गच्चीवरुन ढकललं, नंतर थेट सलाईनमध्येत टॉयलेट क्लिनर टाकलं
Hospital
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 12:50 PM

सिया गोयल प्रकरणामुळे संपूर्ण भारतात पुरुष समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना, आता आणखी एका अतिशय क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. तेलंगणात एका नर्सने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून स्वतःच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी आहे. पण तिने ज्या प्रकारे हत्या केली ते पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

नेमकं काय केलं?

३५ वर्षीय प्रशांत हे आखाती देशात कामानिमित्त राहात होते. पण अमेरिका आणि इराण यांच्यामधील संघर्षामुळे तेथील परिस्थिती बिकट असल्याचे पाहाते ते आखाती देशातून काही दिवसांपूर्वी भारतात परत आले होते. परतल्यानंतर त्यांना पत्नी संध्या यांचा प्रियकराशी (अनिल) विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समजली. यामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. या प्रकरणात संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि अनिलचा मित्र व्यंकट साई यांनी मिळून प्रशांत यांना कायमचे संपवण्याचा कट रचला. त्यांचा कट ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पहिला प्रयत्न : छतावरून ढकलणे

२९ जून रोजी संध्याने प्रशांत यांना दारू पाजली आणि त्यांना एका इमारतीच्या गच्चीवर नेले. तेथे अनिलच्या फोनवरील सूचनेनुसार व्यंकट साईने प्रशांत यांना खाली ढकलले. मात्र, या घटनेत प्रशांत गंभीर जखमी झाले. पण त्यांचा जीव वाचला. त्यांना नेमकं काय झाले हे कळालेच नाही.

दुसरा आणि क्रूर प्रयत्न : सलाईनमधून विष

प्रशांत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्या नर्स असल्याने तिला वैद्यकीय प्रक्रिया चांगली माहिती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना संध्याने कॅन्युलाद्वारे प्रशांत यांच्या सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध इंजेक्ट केले. यामुळे प्रशांत यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम त्यांना छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला आणि तो अपयशी ठरल्यानंतर रुग्णालयात विष देऊन हत्या पूर्ण केली.

पोलिस कारवाई

पोलिसांनी संध्या, अनिल आणि व्यंकट साई या तिघांनाही अटक केली आहे. चौकशीदरम्यान सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Follow Us