AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav: भारतीय संघातील बदलावर सूर्याभाऊची पोस्ट; रागाच्या भरात सगळं बोलून टाकलं; विधानाची जोरदार चर्चा

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे, सध्या भारतीय संघाचे प्रदर्शन खराब असल्याचे पाहायला मिळाले. आता या नव्या भारतीय संघावर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेअर केली आहे.

Suryakumar Yadav: भारतीय संघातील बदलावर सूर्याभाऊची पोस्ट; रागाच्या भरात सगळं बोलून टाकलं; विधानाची जोरदार चर्चा
team india
| Updated on: Jul 07, 2026 | 2:06 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. भारतीय संघाचे टी-20 मधील प्रदर्शन हे खरोखरच कौतुकास्पद होते पण ते टी-20 विश्वचषकापूर्ती. यानंतर भारतीय संघाचे प्रदर्शन काही चांगले राहिलेले नाही. आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. दुबळ्या आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली, आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेत अनेक बदल पाहायला मिळाले. सध्या भारतीय संघ अनेक बदलातून जात आहे. कर्णधार नवीन आहे तसेच संघातही अनेक बदल झालेले दिसत आहे. आता या बदलांवर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एक पोस्ट केली आहे, आता याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सूर्यकुमार यादवकडून टी-20 कर्णधारपद काढून घेण्यात आले असेल आणि त्याला संघातून वगळण्यात आले. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर, सूर्याने वैभव सूर्यवंशीचे कौतुक करत एक मनोबल वाढवणारी पोस्ट केली आणि सोशल मीडियावर त्याच्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या विधानांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. सूर्यकुमार यादवच्या या पोस्टने सोशल मीडियावरील चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सूर्याने लिहिले, “मी संघासाठी खूप आनंदी आहे आणि नेहमीच त्यांना शुभेच्छा देतो. मला माहित आहे की सर्व खेळाडू त्यांचे 100 टक्के देत आहेत आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा नेहमीच असेल. भारतीय क्रिकेट, माझे सहकारी आणि खेळासाठी माझा पाठिंबा नेहमीच राहील. माझ्या नावाशी खोट्या पद्धतीने जोडल्या जाणाऱ्या त्या विधानांपेक्षा माझे काम आणि माझे वर्तन अधिक महत्त्वाचे आहे.”

सूर्यकुमार यादवच्या नावाने एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी खेळाडूंच्या संघात येण्या-जाण्याबद्दल भाष्य केले आहे. याच वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे की, अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये. त्यांनी लिहिले, “माझ्या लक्षात आले आहे की सोशल मीडियावर माझ्या नावाने एक वक्तव्य फिरवले जात आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही किंवा त्याला अधिकृत परवानगी दिलेली नाही. कृपया कोणत्याही पडताळणी न झालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती शेअर करू नका.”

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पदार्पण केले. मात्र, तो केवळ 14 धावाच करू शकला. सूर्यवंशीबद्दल सूर्याने लिहिले, “मला वैभवला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. तू एका अद्भुत प्रवासाची सुरुवात करत आहेस. प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि तुझ्या कामगिरीने देशाला गौरव मिळवून देत राहा.”

Follow Us
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला