AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?

Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 07, 2026 | 11:56 AM
Share

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बचाव पथकांनी आतापर्यंत एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले असून, उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच आमदार योगेश कदम हे सकाळी ६ वाजल्यापासून घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवत आहेत आणि प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.

सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, बचाव पथके प्रत्येक शक्यतेचा विचार करून शोधमोहीम राबवत आहेत.

दरम्यान, परिसरातील काही घरांना दरडीचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती अजूनही गंभीर असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 07, 2026 11:56 AM

Follow Us