AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला

Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड… त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला

| Updated on: Jul 07, 2026 | 11:05 AM
Share

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प दरड कोसळल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुसळधार पावसामुळे टर्मिनल-2 बोगद्याजवळ मोठी दरड कोसळून सुमारे 100 टन माती रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प दरड कोसळल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुसळधार पावसामुळे टर्मिनल-2 बोगद्याजवळ मोठी दरड कोसळून सुमारे 100 टन माती रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर सरकारला लक्ष्य करत उपरोधिक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

संदीप देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, “मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरूच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे, त्यांनी पाकिस्तानला निघून जावे,” असा खोचक टोला लगावला आहे. भाजपकडून विविध मुद्द्यांवर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जाते, त्याचाच संदर्भ घेत देशपांडे यांनी ही उपरोधिक प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, 5 जुलै रोजी पुणे आणि लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळली होती. काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात उद्घाटन झालेल्या या प्रकल्पावर झालेल्या या घटनेमुळे विरोधकांनी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा हटवला आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रात्री उशिरा सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती आणि ढिगारा हटवण्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवरून सुरू झालेल्या या वादाला आता राजकीय रंग चढला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

Published on: Jul 07, 2026 11:05 AM

Follow Us