AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेलचा 589 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 548 रुपयांमध्ये मिळतेय जास्त वैधता, जाणून घ्या फरक

एअरटेलकडे 548 रुपये आणि 589 रुपये किमतीचे दोन प्लॅन आहेत. फरक फक्त किंमत, डेटा, एसएमएस आणि वैधतेमध्ये आहे. रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्यासाठी कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे ते जाणून घेऊयात.

एअरटेलचा 589 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 548 रुपयांमध्ये मिळतेय जास्त वैधता, जाणून घ्या फरक
| Edited By: | Updated on: Jul 07, 2026 | 1:50 PM
Share

भारती एअरटेल म्हणून ओळखली जाणारी एअरटेल कंपनीकडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी अनेक उत्कृष्ट प्लॅन्स आहेत. कारण एअरटेल आपल्या वापरकर्त्यांच्या विविध गरजा पुर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स सादर करत असते. यापैकीच आज आपण एअरटेलचा 548 रुपये आणि 589 रुपयांच्या प्लॅन्सचे फायदे जाणून घेणार आहोत. 548 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 589 रुपयांच्या प्लॅनपेक्षा जास्त आहे. चला तर दोन्ही प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

हे फायदे एअरटेलच्या 548 रूपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत

या प्लॅनमध्ये एकूण 7 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच 900 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देखील मिळतो. 84 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, रिअल-टाइम स्पॅम कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंग, मोफत हॅलोट्यून्स आणि एअरटेल एक्स्ट्रीम प्लेचा ॲक्सेस देखील वापरकर्त्यांना मिळतो.

हे फायदे एअरटेलच्या 589 रूपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत

589 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. 30 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये 4000 रुपये किमतीचे ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, मोफत हॅलोट्यून्स आणि स्पॅम कॉल्स व एसएमएस ब्लॉक करणे यांसारखे अतिरिक्त फायदेही मिळतात.

दोन्ही प्लॅनमधील फरक समजून घ्या

पहिला फरक किंमतीत आहे. दोन्ही प्लॅनमध्ये 41 रूपयांचा फरक आहे. दुसरा फरक डेटामध्ये आहे. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल, तर तुम्ही 589 रूपयांचा प्लॅन निवडाल. हा प्लॅन 548 रूपयांच्या प्लॅनपेक्षा 43GB जास्त डेटा देतो. तिसरा फरक SMS मध्ये आहे. जर तुम्हाला जास्त SMS सुविधा हवे असतील तर तुम्हाला 548 रूपयांच्या प्लॅनमध्ये 600 जास्त SMS मिळतील. चौथा फरक वैधतेमध्ये आहे. जर तुम्हाला जास्त वैधता हवी असेल, तर तुम्ही 548 चा प्लॅन निवडाल ज्यामध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. मात्र 41 रूपयांच्या जास्त खर्च केल्याने वैधता कमी मिळेल.

Follow Us