AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...

मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले…

| Updated on: Jul 07, 2026 | 12:21 PM
Share

राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य भूमिकेबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच झालेल्या सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीत या विषयावर चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य भूमिकेबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच झालेल्या सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीत या विषयावर चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मात्र, या सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत NDAमध्ये जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सक्षम आणि प्रभावी विरोधक म्हणूनच काम करत राहणार असल्याचे म्हटले.

रोहित पवार म्हणाले की, “शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ६० वर्षे आमचा पक्ष भाजप आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात लढत आला आहे. आजही आम्ही सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करत आहोत. त्यामुळे NDAमध्ये जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.”

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि विविध पक्षांतील हालचालींमुळे या चर्चांना वेग आला असला, तरी रोहित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट झाली आहे. आगामी काळात या विषयावर शरद पवार किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणखी कोणती भूमिका मांडली जाते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 07, 2026 12:20 PM

Follow Us
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन

मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं.

मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया.

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया