Mumbai Crime: विंडो एसीतून दागिन्यांच्या दुकानात घुसला, ५ लाखांचे सोने चोरणाऱ्या परप्रांतीयाला अटक

मालाड पोलीसांनी एका परप्रांतीय अशा चोराला अटक केली आहे, जो ग्रिलचे काम करण्याच्या बहाण्याने दुकाने आणि घरांची रेकी करायचा आणि नंतर चोरी करायचा.

Mumbai Crime: विंडो एसीतून दागिन्यांच्या दुकानात घुसला, ५ लाखांचे सोने चोरणाऱ्या परप्रांतीयाला अटक
| Updated on: Jun 06, 2025 | 9:30 PM

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मालाड पोलीसांनी एका परप्रांतीय अशा चोराला अटक केली आहे, जो ग्रिलचे काम करण्याच्या बहाण्याने दुकाने आणि घरांची रेकी करायचा आणि नंतर चोरी करायचा. अशाच एका घटनेत त्याने विंडो एसीतून सोन्याच्या दुकानात प्रवेश करत ५ लाखांचे सोने केले. मात्र पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विंडो एसीमधून दुकानात प्रवेश 

मालाड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मालाडमधील एका दागिन्यांच्या दुकानात विंडो एसीमधून प्रवेश केला आणि लाखो रुपयांचे दागिने चोरून पळ काढला. मालाडमधून सुमारे ५ लाख रुपयांचे सोने चोरून आरोपी पळून गेला होता. त्यानंतर मालाड पोलीसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास केला.

सीसीटीव्हीच्या मदतीने ओळख पटली 

पोलीसांना तपासात आढळले की, आरोपी खिडकीच्या एसीमधून दुकानात शिरला आणि बाहेर पडल्यानंतर त्याने कपडे बदलले आणि पळून गेला. मात्र त्याच्या चपलेवरून त्याचा शोध लागला. पोलिसांनी जुने आणि नवे असे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याच्या चपलेवरून आरोपीची ओळख पटवली. या तपासानंतर पोलीसांना समजले की आरोपी घाटकोपर परिसरात राहतो आणि गेल्या ४ वर्षांपासून ग्रिल बसवण्याचे काम करतो.

परप्रांतीय चोराला अटक 

तपासात पोलीसांना हेही समजले की, आरोपीचे नाव मोकीम मोतिम खान असून तो ३० वर्षांचा आहे. तसेच तो मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. यानंतर पोलीसांनी आरोपीचा मागोवा घेतला आणि त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. अटनेनंतर झालेल्या चौकशीतून असे समोर आले की, आरोपीने चोरीच्या पैशातून एक बाईक देखील खरेदी केली होती. आता या चोराची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याने याआधी कुठे चोरी केली आहे का याचाही तपास केला जात आहे.