AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विमानतळावर थरारक घटना, विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई विमानतळावर अनेकदा सोनं तस्करी करणाऱ्यांना पकडलं जातं. मात्र नुकतीच या विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. 24 वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

मुंबई विमानतळावर थरारक घटना, विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
| Updated on: Jun 06, 2024 | 8:55 AM
Share

मुंबई विमानतळावर अनेकदा सोनं तस्करी करणाऱ्यांना पकडलं जातं. मात्र नुकतीच या विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. 24 वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 3 जून रोजी घडली. मोहम्मद आफ्रिद (वय 24) असे आरोपीचे नाव असून कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. त्याच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल होता. 3 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास दुबईतून मुंबईत आलेला प्रवासी मोहम्मद आफ्रिद याला एका महिला अधिकाऱ्याने अडवले. कर्नाटकातील सिध्दापुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोहम्मद आफ्रिद हा पाहीजे आरोपी असून कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती.

तपासात मोहम्मद आफ्रिद हा तोच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारदारांनी त्याला इमिग्रेशन विंग इनचार्ज यांच्या चौकशी कक्षात बसवून ठेवले. मात्र मोहम्मद आफ्रिद याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू असतानाच ११.३० च्या सुमारास त्याने स्वतः जवळील धारदार वस्तूने डाव्या हाताच्या मनगटाची नस कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. जखमी मोहम्मद आफ्रिद याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला