AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Murder : जेवण चांगले केले नाही म्हणून भांडण, हॉटेल रेसिडेन्सीमध्ये कुकने केली वेटरची हत्या

अंधेरी पूर्वेत सुरण रोडवरील हॉटेल रेसिडेन्सीमध्ये काल संध्याकाळी वेटर जगदीश जलाल याने कुक माधव मंडल याला जेवण बनवायची ऑर्डर दिली होती. मात्र कुक माधव मंडल याने जेवण खराब बनवल्यामुळे वेटर जगदीश जलाल याच्यासोबत बाचाबाची झाली.

Mumbai Murder : जेवण चांगले केले नाही म्हणून भांडण, हॉटेल रेसिडेन्सीमध्ये कुकने केली वेटरची हत्या
हॉटेल रेसिडेन्सीमध्ये कुकने केली वेटरची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 22, 2022 | 10:36 PM
Share

मुंबई : जेवण चांगले बनवले नाही म्हणून झालेल्या वादातून कुक (Cook)ने रागाच्या भरात वेटर (Waiter)ची चाकू भोसकून हत्या (Murder) केल्याची घटना गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास मुंबईतील हॉटेल रेसिडेन्सीमध्ये घडली आहे. क्षुल्लक वादातून झालेल्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जगदीश जलाल असे हत्या करण्यात आलेल्या वेटरचे नाव असून माधव मंडल असे हत्या करणाऱ्या कुकचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी माधव मंडल याला अटक केली आहे. याबाबत पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

चाकूने छातीत आणि पाठीवर वार केल्याने वेटरचा जागीच मृत्यू

अंधेरी पूर्वेत सुरण रोडवरील हॉटेल रेसिडेन्सीमध्ये काल संध्याकाळी वेटर जगदीश जलाल याने कुक माधव मंडल याला जेवण बनवायची ऑर्डर दिली होती. मात्र कुक माधव मंडल याने जेवण खराब बनवल्यामुळे वेटर जगदीश जलाल याच्यासोबत बाचाबाची झाली. याचाच राग मनात धरून माधव मंडल याने किचनमध्ये असलेल्या भाजी कापायच्या चाकूने जगदीशच्या छातीत आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात जगदीशचा जागीच मृत्यू झाला. कुक माधव मंडल याने हत्या केल्यानंतर याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी माधव मंडल याला अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. (A cook killed a waiter due to a dispute over food at a hotel residency in Andheri)

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक