Jayashree Patil : अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांचा सीबीआयने जबाब नोंदवला

| Updated on: Mar 11, 2022 | 12:08 AM

गेल्या आठवड्यात सीबीआयने अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जवाब नोंदविला आहे. आपल्या जवाबात अॅड. जयश्री पाटील यांनी काय माहिती दिली याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला.

Jayashree Patil : अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांचा सीबीआयने जबाब नोंदवला
अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पू्र्ण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणांमध्ये सीबीआयने अॅडव्होकेट जयश्री पाटील (Jayashree Patil) यांचा आज जवाब नोंदवला. सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांकडून जयश्री पाटील यांचा तब्बल 3 तासापेक्षा अधिक काळ जबाब नोंदविण्यात आला आहे. अॅडव्होकेट जयश्री पाटील आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे दोघेही मरीन लाईन येथील मिस्ट्री कोर्ट बिल्डिंगमध्ये पोहचले. जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयला तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आज सीबीआयकडून जबाब नोंदविण्यात आला आहे. (Anil Deshmukh Money Laundering Case Adv. CBI recorded Jayashree Patil’s reply)

गेल्या आठवड्यात आर्थर रोड जेलमध्ये देशमुखांचा जबाब नोंदवला

गेल्या आठवड्यात सीबीआयने अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जवाब नोंदविला आहे. आपल्या जवाबात अॅड. जयश्री पाटील यांनी काय माहिती दिली याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही लढा देत आहोत. त्याच संदर्भात आज आम्ही आपला जवाब नोंदविला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

जयश्री पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती

डॉ. पाटील यांनी 21 मार्च 2021 रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांनी (माजी) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी FIR नोंदवून घेतली नाही आणि पुढे कसली कारवाई सुद्धा केली नाही. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी करणारी याचिका डॉ. पाटील यांनी दाखल केली होती. (Anil Deshmukh Money Laundering Case Adv. CBI recorded Jayashree Patil’s reply)

इतर बातम्या

Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू

Delhi Crime : आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग पट्ट्याने मारहाण, दिल्लीतील धक्कादायक घटना