Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू

या गाडीत सहा माणसे प्रवास करीत होती. यापैकी दोन जण दगावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे.

Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:16 PM

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात (Accident) झाला असून एक चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळली. या गाडीत सहा माणसे प्रवास करीत होती. यापैकी दोन जण दगावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंबा घाटातील गायमुखच्या आधीच्या वळणावर हा अपघात झाला. साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन (Rescue Operation) सुरु आहे. याच ठिकाणचा हा दुसरा अपघात आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. यापूर्वी स्विफ्ट कार खाली गेली होती. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाला. (Woman dies with one-month-old baby in Amba Ghat accident on Ratnagiri-Kolhapur highway)

सांगलीहून गणपतीपुळेला चालले होते सर्वजण

सांगली येथील डॉक्टर हरकूडे आणि डॉक्टर फुलारे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी चालले होते. दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून हे निघाले होते. विसावा पॉइंट या ठिकाणी फोटोग्राफी करून यातील एक गाडी गणपतीपुळे दिशेने निघाली. यामागे येणाऱ्या दुसऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. साखरपा पोलिस आणि स्थानिकांनी गाडीतील तीन लहान मुलांना रेस्क्यू केले असून त्यांना उपचारासाठी मलकापूर आणि सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातात एक महिला आणि हरकूडे कुटुंबातील एक महिन्याचे बाळ दगावले आहे.

पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात

पालघर माहिम रोडवर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. अपघात एवढा भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. गंगाधर देवकाते (42) असे अपघातात ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. माहिम रोडवर पानेरीजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. अपघाताची नोंद सातपाटी सागरी पोलीस अंतर्गत माहिम पोलीस चौकीत करण्यात आली. मयत शिक्षक देवकाते हे जालन्याहून पालघरमध्ये आपल्या भावाकडे कुटुंबासह आले होते. देवकाते एकटेच आपली कार घेऊन माहिमच्या दिशेने पालघरला परतत असतानाच पानेरी जवळ त्यांची कार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. स्थानिकांनी तात्काळ त्यांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Woman dies with one-month-old baby in Amba Ghat accident on Ratnagiri-Kolhapur highway)

इतर बातम्या

Buldhana | समृद्धीच्या कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाख रुपयांचा दंड, तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात दिलंय नेमकं कारण

Pune Crime | पुण्यातून ‘इसिस शी संबंध असल्याच्या संशयतून एकजण ताब्यात ; एनआयए ने केली कारवाई

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.