Borivali Accident : भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक

बोरिवलीमध्ये रात्री उशिरा घडला भीषण अपघात, डंपरने बाईकस्वारांना चिरडलं!

Borivali Accident : भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 8:16 AM

मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं (Road Accident News in Maharashtra) सत्र सुरुच आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत (Borivali Accident) रात्री उशिरा भीषण अपघात घडला. एका डंपर आणि दोन दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही बाईक डंपरखाली (Bike accident) आल्या. त्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. दोन दुचाकीस्वार या भीषण अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बोरिवली पश्चिम भागातील बोरिवली ते गोराई रोडवर हा भीषण अपघात घडला. या अपघातात बाईकवरील व्यक्तींना जबर फटका बसला. त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नेमका हा अपघात कशामुळे घडला हे कळू शकलेलं नाही.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने अपघाताचा पंचनामा केला. रात्रीची वेळ असल्यानं फारशी वाहतूक रस्त्यावरुन सुरु नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवला नाही. परिसरातील लोकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य केलं.

हे सुद्धा वाचा

या अपघातात नेमकी चूक कुणाची, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातो आहे. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकी या अपघातानंतर डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याचं दिसून आलं आहे. डंपरच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आलेल्या दुचाकींचं नुकसान झालं असून दुचाकीस्वार अगदी थोडक्यात भीषण अपघातातून बचावलेत.

एक स्कूटी आणि रॉयल इनफिल्ड या दोन बाईक डंपरला डाव्या बाजूने विचित्रपणे धडकल्या. यातील स्कूटी ही सरळ रेषेतच डंपरच्या आतमध्ये अडकली गेली होती. तर बुलेट डंपरच्या चाकाखाली आली. यात स्कूटीसह रॉयल इनफिल्ड या दोन्ही दुचाकींचं मोठं नुकसान झालं होतं.

या अपघातानंतर काही काळ अपघातस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलिसांनी लगेचच अपघाताप्रकरणी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.