ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, माजी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई

| Updated on: Jul 15, 2021 | 12:20 AM

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपायुक्त डॉ. विश्वानाथ केळकर यांच्या विरोधात अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, माजी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई
सांकेतिक फोटो
Follow us on

ठाणे : महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपायुक्त डॉ. विश्वानाथ केळकर यांच्या विरोधात अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्दा दाखल करण्यात आला आहे. करोना रुग्णालयातील 38 वर्षीय माजी महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (case of molestation filed against Thane Municipal Corporation medical officer Vishwanath Kelkar)

चित्रा वाघ यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल 

याप्रकरणी भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी 14 जुलै रोजी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन नंतर पोलिसात तक्रार केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

“डॉ. विश्वनाथ केळकर यांनी पीडित मुलीला आधी ठाणे महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागात स्टाफ नर्समधून बढती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचा छळ केला. तिला कामावरून काढून टाकले. केळकर यांनी मुलीसोबत अश्लील भाषेत बातचित केली. मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मिळालेला नाही”, असं चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

‘पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही’

तसेच “पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले. दुसरीकडे जी विशाखा कमिटी नेमली आहे ती कमिटीदेखील डॉ विश्वनाथ केळकर यांनी नेमली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत”, असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला.

इतर बातम्या :

नशा का करतो म्हणून विचारताच भडकला, विचित्र हावभाव करत छेड काढल्यामुळे महिला पोलिसाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : गुन्हेगाराला केक भरवताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनेकांकडून कारवाईची मागणी, व्हिडीओ व्हायरल

‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं

(case of molestation filed against Thane Municipal Corporation medical officer Vishwanath Kelkar)