ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ, मुलीशी अश्लील भाषेत बातचित, पीडितेच्या न्यायासाठी चित्रा वाघ कडाडल्या

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ, मुलीशी अश्लील भाषेत बातचित, पीडितेच्या न्यायासाठी चित्रा वाघ कडाडल्या
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 4:13 PM

ठाणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “डॉ. विश्वनाथ केळकर यांनी पीडित मुलीला आधी ठाणे महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागात स्टाफ नर्समधून बढती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचा छळ केला. तिला कामावरून काढून टाकले. केळकर यांनी मुलीसोबत अश्लील भाषेत बातचित केली. मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मिळालेला नाही”, असं चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

‘पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही’

“पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले. दुसरीकडे जी विशाखा कमिटी नेमली आहे ती कमिटीदेखील डॉ विश्वनाथ केळकर यांनी नेमली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत”, असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला.

‘शक्ती कायदा नेमका कोणासाठी?’

“निर्भया प्रकरणानंतर देखील शक्ती कायदाचा उपयोग होत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलिसांनी लोकांच्या हिताचे काम केले पाहिजे. शक्ती कायदा बलात्कार होण्यापासून वाचवण्यासाठी आहे. आता शक्ती कायदा कोणासाठी आहे काय माहित? पण पीडितेला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत भाजप याचा पाठपुरवढा करणार”, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली. दरम्यान, या प्रकरणावरुन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेमांगी कवीच्या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया

चित्रा वाघ यांनी यावेळी अभिनेत्री हेमांगी कवीच्या फेसबुक पोस्टवरुनही प्रतिक्रिया दिली. “हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ती एक चांगली अभिनेत्री आहे. मात्र त्याबाबत काहीजण विकृतपणे लिहीत आहेत. आता तर मुलींनी रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे. सोशल मीडियावर मुलींबाबत अश्लील प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. सायबर सेल झोपली आहे का? त्यांनी अशा लोकांना दणके दिले पाहिजेत”, असं चित्रा वाघ म्हणाले.

संबंधित बातमी :

हेमांगी कवी पोळ्या लाटत होती, ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, चित्रा वाघ संतापल्या

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.