CCTV Video : विनायक मेटेंच्या अपघातातील ट्रकचं सीसीटीव्ही फुटेज समोर, ट्रक चालकाला अटक; ट्रकही ताब्यात घेतला !

उमेश यादव असे चालकाचे नाव असून कासा पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केली जात आहे. ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रकमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CCTV Video : विनायक मेटेंच्या अपघातातील ट्रकचं सीसीटीव्ही फुटेज समोर, ट्रक चालकाला अटक; ट्रकही ताब्यात घेतला !
विनायक मेटेंच्या अपघातातील टेम्पोचं सीसीटीव्ही फुटेज समोर
Image Credit source: TV9
प्रवीण चव्हाण

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 14, 2022 | 11:40 PM

पालघर : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला आयशर ट्रक (Eicher Tempo) गुजरातमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पालघर पोलिसांनी ताब्या घेतलेला ट्रक कासा येथे आणत रायगडकडे अधिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पोलिसांच्या टीम सोबत रवाना केला आहे . पालघर, ठाणे, नवी मुंबई, सह गुन्हे प्रकटीकरण पथक अपघात केलेल्या गाडीच्या तपासासाठी कार्यरत होते. ट्रक घेऊन पोलीस मुंबईत असल्याचे कळते. मेटे यांच्या गाडीला धडक देऊन या ट्रकने थेट पालघरच्या दिशेने पळ काढला होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या सहाय्याने ट्रकचा नंबर शोधून चालकाला ताब्यात घेतले आहे. डीएन 09 पी 9404 असा या ट्रकचा नंबर आहे. उमेश यादव असे चालकाचे नाव असून कासा पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केली जात आहे. ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रकमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रक ताब्यात घेण्यासाठी पोलीस वापीला रवाना

विनायक मेटे यांच्या कारचा अपघात आज पहाडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात होऊन यात त्यांचा त्यात मृत्यू झाला. मेटे यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती. धडक देणारा डीएन 09 पी 940 क्रमांकाचा ट्रक हा पालघरमधील कासा येथील आहे. सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी हा आयशर ट्रक चारोटी टोलनाक्यावरून गुजरातच्या दिशेने पास झाला होता. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. मात्र त्याला ताब्यात घेण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक उमेश यादव ट्रक घेऊन गुजरातमधील वापी येथे पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पालघर आणि रायगड पोलिसांनी वापी येथून ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच ट्रक ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक वापीला रवाना झाले होते. ट्रक ताब्यात घेऊन पोलीस रायगडकडे रवाना झाले आहेत. (CCTV footage of Vinayak Metes accident truck in front, Police left for Vapi to seize the truck)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें