सासूचे दागिने सुनेने लांबवले, प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात

घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते, असे सुनेने सांगितले. सून घरातून तिच्या मित्रासह निघून गेली. त्यानंतर आपण घरातील कपाट तपासले असता तिजोरीतील ७ लाख ९१ हजार ७०९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.

सासूचे दागिने सुनेने लांबवले, प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात
Jitendra Zavar | Updated on: Apr 15, 2025 | 8:01 AM

Crime News: सासू आणि सुनेमधील नोकझोक अनेक ठिकाणी होत असते. परंतु डोंबिवलीमध्ये सासू आणि सुनेबाबत वेगळाच प्रकार घडला आहे. डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमधून ही घटना समोर आली आहे. सुनेने सासूचे दागिने लांबवले आहे. त्यानंतर सून फरार झाली आहे. दागिन्यांची किंमत ७ लाख ९१ हजार रुपये आहे. या प्रकरणात सुनेसोबत तिच्या मित्रावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून आणि तिचा मित्र फरार असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये राहणाऱ्या एका सासूने आपल्या सुनेसोबत तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत सुनेने तिच्या मित्रासोबत घरातील ७ लाख ९१ हजार ७०९ रुपयांचे दागिन्यांची चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिची ३५ वर्षांची सून सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तिने घरातील दागिने लंपास केले आहे. चोरीस गेलेल्या सोन्याच्या ऐवजांमध्ये दोन मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, राणी हार, गंठण, सोन्याचे कडे असे एकूण सोन्याचे ११ ऐवज आहेत.

घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते, असे सुनेने सांगितले. सून घरातून तिच्या मित्रासह निघून गेली. त्यानंतर आपण घरातील कपाट तपासले असता तिजोरीतील ७ लाख ९१ हजार ७०९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेतला असता दागिने कुठेही आढळून आले नाहीत. घरात बाहेरून कुणीही आले नाही. घरात चोरी झालेली नाही. त्यामुळे दागिने चोरी होण्याचा प्रश्न येत नसल्याने घरातच हे दागिने चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करून सासुने हे दागिने आपली सून आणि तिच्या मित्राने संगनमत करून चोरल्याचा संशय व्यक्त केला.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी महिला आणि तिचा मित्र अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस विविध ठिकाणी तपास करत आहेत.

Follow Us