AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई बंदरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई, नार्को टेररचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी 2 अफगाण नागरिकांना अटक केली होती. या दोघांनी नार्को टेररचा पर्दाफाश केला होता.

मुंबई बंदरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई, नार्को टेररचा पर्दाफाश
न्हावाशेवा बंदरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाईImage Credit source: Aaj Tak
| Updated on: Sep 21, 2022 | 5:33 PM
Share

मुंबई : स्पेशल सेलने मुंबईतील न्हावाशेवा बंदरा (Nhava Sheva Port)वर छापा टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज (Drugs) पकडण्यास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आले आहे. स्पेशल सेलने एक कंटेनर जप्त केला आहे, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची हेरॉईन कोटेड दारू (Heroin Coated Liquor) भरण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 1800 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी 2 अफगाण नागरिकांना अटक केली होती. या दोघांनी नार्को टेररचा पर्दाफाश केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन स्पेशल सेलच्या पथकाने 1200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टाकला छापा

या दोन्ही परदेशी नागरिकांची बराच वेळ चौकशी केली असता, मुंबई बंदरातील कंटेनरमध्येही अंमली पदार्थ असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात पोहोचले आणि तेथे छापा टाकला.

छाप्यात एका कंटेनरमधून 20 टनहून अधिक हेरॉईनयुक्त दारू जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी हेरॉईन जप्ती आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अंदाजे 1800 कोटी रुपये आहे.

नार्को टेररशी संबंधित आहे हे ड्रग्ज

स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्जच्या खेपेचे नार्को टेररशी संबंधित आहेत. दिल्ली पोलिसांचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकाने 20-21 या वर्षात सर्वाधिक ड्रग्ज पकडले असून त्यात सर्वाधिक प्रकरणे नार्को टेररची आहेत.

नार्कोटिक्स ब्युरो आणि डीआरआय अनभिज्ञ

आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबई बंदरात हेरॉइन-कोटेड दारूने भरलेल्या कंटेनरची नार्कोटिक्स ब्युरो आणि डीआरआयच्या पथकाने अनेकदा तपासणी केली. मात्र तरीही या ड्रग्बाबत ते अनभिज्ञ राहिले. पण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या कंटेनरमधूनच ड्रग्ज जप्त करत तो कंटेनर दिल्लीत आणला.

अत्यंत संवेदनशील मानली जाते ही कारवाई

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील म्हटले जात आहे. कारण दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया नूरजहीची अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. अफगाणिस्तान तुरुंगातून अमेरिकन नागरिकाच्या सुटकेच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले आहे.

80 च्या दशकात, नूरजाही अफगाणिस्तानच्या तन्झिमोपासून ते जगातील अनेक देशांपर्यंत ड्रग्ज व्यवसायाचा मास्टर होती. त्याने अनेक वर्षे ड्रग एजंट म्हणून अमेरिकेत काम केले. त्यानंतर अमेरिकन एजंट्सशी झालेल्या भांडणामुळे नूरला अमेरिकेतच तुरुंगवास भोगावा लागला.

मुल्ला उमरचा निकटवर्तीय मानला जातो नूर

आता नूरच्या सुटकेने पुन्हा एकदा अफगाणिस्तानपासून संपूर्ण जगाला अंमली पदार्थांचा मोठा धोका निर्माण होण्याचे संकेत आहेत. तालिबानच्या प्रमुख नेत्यांनी नूरच्या सुटकेची मागणी अमेरिकेकडे केली होती. नूर हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा निकटवर्तीय मानला जातो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.