AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पूल’ चोरीला! 6000 किलोंचा 90 फुटी ब्रिज चोरट्यांकडून लंपास, मुंबईतलं हे नेमकं प्रकरण काय?

चोरटे काय चोरतील याचा भरोसा नाही. मुंबईच्या मालाड परिसरात तर एक विचित्रच घटना समोर आली आहे. चार चोरट्यांनी 90 फुटांचा पूल चोरी केला. या पुलाचं वजन तब्बल 6 हजार किलो इतकं आहे. त्यामुळे या चोरट्यांनी एवढा मोठा पूल नेमका चोरला कसा असेल? या विचाराने अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत.

'पूल' चोरीला! 6000 किलोंचा 90 फुटी ब्रिज चोरट्यांकडून लंपास, मुंबईतलं हे नेमकं प्रकरण काय?
(संबंधित पूल हा तिथला नवा पूल आहे)
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 08, 2023 | 11:03 PM
Share

मुंबई : मुंबईत गुन्हेगारी फोफावली आहे. मुंबईत सातत्याने चोरीच्या घटना समोर येत असतात. पण चोरटे काय चोरतील याचा अंदाज नाही. काही चोरटे घरफोड्या करतात, काही चोरटे लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांचे खिसे कापतात. काही चोरटे मोबाईल चोरी करतात. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यशही येतं. पण चोरटे त्यांची विकृती काही सोडताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे मुंबईत एक अतिशय विचित्र प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चक्क 90 फूट लांबीचा लोखंडी पूलच चोरुन नेला. या पुलाचं वजन तब्बल 6 हजार किलो इतकं आहे. पण चोरट्यांनी हा पूलही स्वत:च्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची ही चोरी मुंबई पोलिसांकडून पकडण्यात आली आहे.

मुंबईत मालाड परिसरात हा पूल होता. खरंतर हा पूल अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा आहे. मुंबईतील मालाड भागात मागच्या रस्त्यावर एका नाल्याच्या वर तो ठेवण्यात आला होता. मोठ्या वीज तारा वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जात होताय नंतर नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधल्यावर लोखंडी पूल अन्य ठिकाणी हलवण्यात आला. पण हा पूलच चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे वजन 6 हजार किलो होते. चोरट्यांनी आधी हा पूल गॅस कटरने कापला आणि नंतर तो ट्रकमध्ये नेला. बांगूर नगर पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून 4 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

पोलिसांना तपासादरम्यान कळले की, ब्रिजला 6 जूनला शेवटचे पाहिले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडले. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये 11 जूनला एक मोठा ट्रक पुलाकडे जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकच्या नंबरप्लेटवरुन चोरांना शोधून काढलं.

पोलिसांना तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच चोरीची घटना घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सध्या आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. तसेच पुलाचा मालही जप्त करण्यात आला आहे.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल