विक्रीसाठी गुटख्याचा साठा, 20 लाखांचा गुटखा जप्त, एकाला बेड्या, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली होती. (Gutkha stocks for sale, gutkha Rs 20 lakh seized in Mumbai)

विक्रीसाठी गुटख्याचा साठा, 20 लाखांचा गुटखा जप्त, एकाला बेड्या, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखांचा गुटखा जप्त केला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली होती. (Gutkha stocks for sale, gutkha Rs 20 lakh seized, action taken by anti-narcotics squad navi mumbai)

नवी मुंबई पोलीसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. त्याकरिता आयुक्तालय क्षेत्रात नशामुक्ती अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थ विक्रेत्यांसह नशा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार अमली पदार्थ विक्रेत्यांच्या शोधात नवी मुंबई पोलीस आहेत.

अशी झाली कारवाई…

यादरम्यान करावे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक जयरात छापरिया यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी कुसूरकर, हवालदार कासम पिरजादे इकबाल शेख यांचे पथक तयार केले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी करावे सेक्टर 36 येथील लक्ष्मी किराणा स्टोअर या दुकानावर छापा टाकला.

त्यामध्ये दुकानात व दुकानदार राजूराम आसाराम देवासी याच्या घरातून तब्बल 20 लाख 46 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. हा गुटखा जप्त करून देवासीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईची कौतुक

अमली पदार्थ विक्रेत्यांच्या शोधात नवी मुंबई पोलीस आहेत. करावे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Gutkha stocks for sale, gutkha Rs 20 lakh seized, action taken by anti-narcotics squad navi mumbai)

हे ही वाचा :

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

बंदुकीच्या धाकावर दागिन्यांसह 4 लाख लुटले, पोलिसांनी 12 तासाच्या आत आवळल्या मुसक्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI