AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावरील मैत्रिणीवर जीव जडला, पण तिनेच घात केला, हनीट्रॅपमध्ये अडकवत लाखो लुटले, बांधकाम व्यावसायिकाची दर्दभरी कहाणी

सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे.

सोशल मीडियावरील मैत्रिणीवर जीव जडला, पण तिनेच घात केला, हनीट्रॅपमध्ये अडकवत लाखो लुटले, बांधकाम व्यावसायिकाची दर्दभरी कहाणी
प्रातिनिधिक फोटो
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 17, 2021 | 7:34 PM
Share

नवी मुंबई : सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या या तरुणीने बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवलं. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे.

आरोपी तरुणीचा पती जेलमध्ये

केवळ नववी पास असलेली ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप करणाऱ्या नव्या टोळीचा उदय झाला. अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरुन तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले.

तक्रारीनंतर अवघ्या 72 तासात बेड्या

मात्र चार दिवसांपूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली. या टोळीने पनवेल येथील 31 वर्षीय व्यवसायिकाला मारहाण करत खंडणी उकळली होती. या घटनेंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविंद्र भगवान बदर (वय 26), सचिन भातुलकर, आण्णा साळुंके (वय 40), अमोल ढवळे (वय 32), मंथन शिवाजी पवार (वय 24) आणि 19 वर्षीय तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टोळीने अनेकांना लुबाळल्याचा पोलिसांचा अंदाज

या टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरुन पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

वाघ आणि बिबट्याची नखे विकायचे, वन विभागाने सापळा रचला, रंगेहात मुसक्या आवळल्या, वाचा थरार

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप