Mumbai Murder : पत्नी चुकीच्या संगतीला लागली म्हणून पतीकडून गळा आवळून हत्या

| Updated on: May 28, 2022 | 6:02 PM

आरोपी अन्सार अली आणि रोझी खातून यांचा 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघेही मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी वाहन चालक म्हणून काम करतो आणि अनेकदा कामानिमित्त बाहेर असायचा. याच दरम्यान पत्नी चुकीच्या संगतीत लागल्याचे आरोपी म्हणणे आहे. वारंवार समजावूनही पत्नी संगत सोडण्यास तयार नव्हती.

Mumbai Murder : पत्नी चुकीच्या संगतीला लागली म्हणून पतीकडून गळा आवळून हत्या
पत्नी चुकीच्या संगतीला लागली म्हणून पतीकडून गळा आवळून हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : पत्नी चुकीच्या महिलेच्या संगतीला लागली आणि वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने पती (Husband)ने गळा आवळून पत्नी (Wife)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली आहे. अन्सार अली असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर रोझी खातून असे मयत पत्नीचे नाव आहे. महिलेच्या बहिणीने याबाबत फिर्यादीला माहिती दिल्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरुन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पळून गेला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपीचा शोध घेत त्याला प्रयागराज येथून अटक केली. आरोपी विरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

उशीने गळा आवळून पत्नीची हत्या

आरोपी अन्सार अली आणि रोझी खातून यांचा 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघेही मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी वाहन चालक म्हणून काम करतो आणि अनेकदा कामानिमित्त बाहेर असायचा. याच दरम्यान पत्नी चुकीच्या संगतीत लागल्याचे आरोपी म्हणणे आहे. वारंवार समजावूनही पत्नी संगत सोडण्यास तयार नव्हती. रात्री उशिरापर्यंत फोनवर व्यस्त असायची. याचाच राग पतीच्या मनात होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी जेवण करुन झोपले. त्यानंतर रात्री गाढ झोपेत असताना आरोपीने उशीने पत्नीचा गळा आवळला. यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

हत्येची माहिती मिळताच दिंडोशी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि रेल्वे स्थानकातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासानंतर आरोपी अन्सार अली छपरा गेदान एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या रेल्वेच्या मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकावरी पोलिसांना अलर्ट करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी पोलिसांचे एक पथकही हवाईमार्गे उत्तर प्रदेशात प्रयागराज स्थानकावर जाऊन पोहचले. एक्स्प्रेस रेल्वे स्थानकात आल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची पोलिसांनी तपासणी केली. तर पोलिसांच्या एका पथकाने संपूर्ण रेल्वेची तपासणी केली असता आरोपी एका टॉयलेटमध्ये लपून बसलेला आढळला. पोलिसांनी त्यास अटक करुन मुंबईत आणले. (Husband kills wife in Goregaon Mumbai over domestic dispute)

हे सुद्धा वाचा