Jammu Kashmir : कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटक

ट्रकची झडती घेतली असता ट्रकमधील तीन जणांकडून सात किलो हेरॉईन आणि दोन आयईडी अशी अंमली पदार्थाची सात पाकिटे जप्त करण्यात आली. इम्तियाज अहमद, गुलाम नबी आणि शम्स बेगम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते चित्रकूट तंगदार येथील रहिवासी आहेत.

Jammu Kashmir : कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटक
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटक
Image Credit source: TV9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 28, 2022 | 4:38 PM

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर पोलिस (Jammu-Kashmir Police) आणि लष्कर (Army) यांनी संयुक्त कारवाई करत उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अंमली पदार्थ (Drugs) आणि आयईडीसह तीन संशयितांना अटक (Arrest) केली आहे. साधना टॉप येथे नियमित तपासणी दरम्यान एका वाहनातून मोठ्या प्रमाणात हेरॉईन आणि दोन आयईडी जप्त करण्यात आले. ही तस्करी सीमेपलिकडून करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी रात्री उशिरा पोलीस आणि लष्कराच्या एनसी पास (साधना पास) येथे नियमित नाका तपासणीदरम्यान एका ट्रकवर कारवाई करण्यात आली. इम्तियाज अहमद असे या ट्रकच्या चालकाचे नाव असून तो चित्रकोट कर्नाह येथील रहिवासी आहे.

ट्रकची झडती घेतली असता ट्रकमधील तीन जणांकडून सात किलो हेरॉईन आणि दोन आयईडी अशी अंमली पदार्थाची सात पाकिटे जप्त करण्यात आली. इम्तियाज अहमद, गुलाम नबी आणि शम्स बेगम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते चित्रकूट तंगदार येथील रहिवासी आहेत. हे तिघे दहशतवादी कारवायांसाठी खोऱ्यातील इतर भागात अंमली पदार्थ आणि आयईडी घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया करण्याचा कट

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सतत कुरघोड्या करत काश्मीर खोऱ्यातील वातावरण धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी बुधवारी संध्याकाळी काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील हिश्रू भागात टीव्ही अभिनेत्री अमरीन बट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने अमरीन बटच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. अमरीन भट या काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही कलाकार होत्या.

दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचा अवलंब

जम्मू-काश्मीरचे वातावरण बिघडवण्यासाठी दहशतवादी टार्गेट किलिंगचा अवलंब करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून दहशतवाद्यांनी 16 नागरिकांची हत्या केली आहे. मात्र, भारतीय सुरक्षा दलांकडूनही सातत्याने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. लष्कर आणि पोलिस जवान दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. गेल्या 3 दिवसांत सुरक्षा दलांनी 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून या वर्षात आतापर्यंत जवळपास 80 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (Three suspects arrested with drugs and IEDs in Kupwada in Jammu Kashmir)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें