Aryan Khan: आर्यन खानला जाणीवपूर्वकच गोवलं! बेकायदेशीररित्या आर्यनचे चॅट वाचले, SITचा अंतर्गत निष्कर्ष

Aryan Khan: आर्यन खानला जाणीवपूर्वकच गोवलं! बेकायदेशीररित्या आर्यनचे चॅट वाचले, SITचा अंतर्गत निष्कर्ष
आर्यनला जाणीवपूर्व गोवण्यात आले, एसआयटीचा रिपोर्ट
Image Credit source: tv9

एसआयटीने दिलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, एकूण चौकशी पाहता, तपास अधिकारी काहीही करुन या प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन याला गुंतवण्याच्या प्रयत्नात होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 2:43 PM

मुंबई– अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan clean chit)हा क्रूझ ड्र्ग्ज प्रकरणात निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्यनच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा एनसीबीच्या (NCB)हाती लागलेला नाही. कोणत्याही साक्षीदाराने वा आरोपीने त्याच्याकडे ड्रग्ज असल्याचे सांगितलेले नाही. आर्यनला या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आता एनसीबीने त्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवले होते का, अशी चरप्चा सुरु झाली आहे. एनसीहीच्या अंतर्गत अहवालातही हा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्याविरोधात लाच घेण्याबाबातचे आरोप झाल्यानंतर हे प्रकरण दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आले होते. एसआयटीने दिलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, एकूण चौकशी पाहता, तपास अधिकारी काहीही करुन या प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन याला गुंतवण्याच्या प्रयत्नात होते.

जप्त केला नसेलल्या फोनमधील व्हाटअप चॅट वाचले

या प्रकरणातील दुसरा आरोपी अरबाज मर्चंट याने ड्रग्जचा आर्यनशी काहीही संबंध नाही, हे सांगितलेले असतानाही, तपास अधिकाऱ्यांनी आर्यन खान याचा फोन अधिकृतरित्याजप्त न करताही त्यातील व्हॉट्सअप चॅट वाचले आणि त्याची माहिती माध्यमांपर्यंतही पोहचली. अरबाज मर्चंट हा आर्यन खान याचा मित्र आहे. त्याच्याकडून एनसीबीने कथित सहा ग्रॅम चरस जप्त केले आहे.

तपास अधिकाऱ्यांवर कोर्टातही प्रश्न उपस्थित होणार

या प्रकरणात एनसीबीने जी कारवाई केली, त्यात अनेक त्रुटी होतया, असेही या एसआयटीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येऊ शकतात. ड्रग्जच्या प्रकरणात आरोपींकडे ड्रग्ज सापडलेले नसले आणि ठोस पुरावे नसले तर कोर्ट अशा आरोपींना सोडून देण्याची शक्यताच जास्त असते. अशा स्रव स्थितीत एनसीबीची काम करण्याची पद्धत हा खटला कमकुवत करण्याचीच शक्यता अधिक मानली जाते आहे.

आर्यनने क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्यासाठी दिलेला नकार

अरबाज मर्चंट हा कधीकधी ड्रग्ज घेतो, याची माहिती आर्यनला होती. ही माहिती अरबाजनेच तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच क्रूझवर अरबाजने ड्रग्ज नेऊ नये, असेही आर्यनने मर्चंटला सांगितले होते, असे अरबाजने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. एनसीबी सक्रिय आहे आणि ड्रग्ज नेल्यास ते अडचणीत येऊ शकतील, असेही आर्यनने अरबाजला बजावले होते.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला बंद

एनसीबीने या प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास आता थांबवला आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाची चौकशी करीत होते. मात्र त्यांच्या तपासात आत्तापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

जाणीवपूर्वक निर्दोषांना फसवणाऱ्यांवर कारवाई व्हावी-गृहमंत्री

आर्यन खानला मिळालेल्या क्लीन चिटमुळे, या प्रकरणात खरेपणा नव्हता, हे उघड झाल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याकडे केंद्राने गांभिर्याने पाहावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. अधिकारांचा गैरवापर करत जर कुणी निर्दोष व्यक्तींना गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कारवाईची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें