AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय शिंदेचा उल्लेख करत…कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपीच्या आत्महत्येनंतर वकिलाचा मोठा दावा

Kalyan Crime Vishal Gawali: विशाल गवळी हा कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता. त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहे. त्यात बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे होते. त्याची तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती.

अक्षय शिंदेचा उल्लेख करत...कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपीच्या आत्महत्येनंतर वकिलाचा मोठा दावा
Vishal Gawali
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 13, 2025 | 10:58 AM
Share

Kalyan Crime Vishal Gawali: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मागील वर्षी डिसेंबर महिन्यात घडला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा तळोजा कारागृहात होता. त्याने कारागृहात गळफास घेत रविवारी पहाटे आत्महत्या केली. त्यानंतर त्याचे वकील संजय धनके यांनी मोठा आरोप केला आहे. संजय धनके म्हटले की, विशाल गवळी आत्महत्या केली नसेल त्याला मारले गेले असेल. अक्षय शिंदे सारखे त्याला देखील मारले गेले असेल, असा आरोप त्यांनी केला.

टॉवेलने घेतला गळफास

कल्याण अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहामध्ये पहाटे साडेतीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पहाटे साडेतीन वाजता टॉयलेटला गेला होता. त्यावेळी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पीडित मुलीचे वकील म्हणाले…

दरम्यान, पीडित मुलीचे वकील नीरज कुमार यांनी सांगितले की, आरोपी विशाल गवळी याला न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. त्याला फाशी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न देखील सुरू होते. मात्र त्याने आत्महत्या केली तरी एका प्रकारे आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशी झाली असती तर अत्याचारासारखे कृत्य करणाऱ्यांवर कायद्याची दहशत राहिली असती. त्याने आत्महत्या जरी केली तरी आम्हाला न्याय मिळाला, असे वाटत आहे.

विशाल गवळी सराईत गुंड

विशाल गवळी हा कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता. त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहे. त्यात बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे होते. त्याची तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. त्याने २३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याने त्याच्या घरात त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. हा खटला जलदगती न्यायालयात सुरु होता.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा