AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्थानकावर स्फोटकं ठेवणाऱ्या दोघांना बेड्या, मोठा घातपाताचा होता कट?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी कल्याण स्काय वॉकवर रात्री झोपलेल्या दाम्पत्याची बॅग चोरली. त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एकवर आले.

कल्याण रेल्वे स्थानकावर स्फोटकं ठेवणाऱ्या दोघांना बेड्या, मोठा घातपाताचा होता कट?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 24, 2024 | 9:29 PM
Share

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 24 फेब्रुवारी 2024 : कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वर 21 फेब्रुवारीला स्फोटकांच्या 54 इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. या वेळेस कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बॉम्ब स्कॉटच्या मदतीने हे स्फोटक इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या ताब्यात घेतल्या होत्या. पोलिसांनी त्यानंतर अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांना सीसीटीव्हीच्या मदतीने स्फोटक पदार्थांची बॅग स्टेशनवरती टाकणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू, ऋषीकेश देविदास निकुंभ असे या आरोपींची नावे आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांना या प्रकरणात मोठं यश आलंय. पण अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

आरोपींना बॅग चोरली मग…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी कल्याण स्काय वॉकवर रात्री झोपलेल्या दाम्पत्याची बॅग चोरली. त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एकवर आले. त्यांनी अंधारात त्या बॅगेत काही मौल्यवान वस्तू मिळतात का? याची तपासणी केली. त्यांनी बॅगेतले गरजेचे सामान काढून घेतले. त्यानंतर त्यांनी स्फोटक पदार्थ बॅगेत टाकले. स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवून त्यांनी तिथून पळ काढला.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना आता ताब्यात घेतलं आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ती बॅग आणणारे ते दोघे कोण होते? याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत. आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा घातपात घडवण्याचा कट होता की त्यांना दुसरीकडे घातपात घडवायचा होता? त्यांनी ती स्फोटकं का बाळगली? कल्याण रेल्वे स्थानकावर का ठेवली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी