सना हीच सीमा होती, चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दोघांना बघून पोलीस चक्रावले

| Updated on: Jun 20, 2021 | 5:19 PM

काही घटना या अशा घडतात की त्या घटनांचा उलगडा लागल्यावर पोलीसही चक्रावून जातात. तशी ही घटना हत्येची किंवा चोरीची नाही. पण थोडी विचित्रच आहे (Kalyan police found married woman and youth who missing from four years)

सना हीच सीमा होती, चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दोघांना बघून पोलीस चक्रावले
चार वर्षांपूर्वी महिला रेल्वेतून गायब, तिच्या पाठोपाठ कंपनीतील सहकारी शाहबाजही बेपत्ता, चार वर्षांनी सापडले
Follow us on

कल्याण : काही घटना या अशा घडतात की त्या घटनांचा उलगडा लागल्यावर पोलीसही चक्रावून जातात. तशी ही घटना हत्येची किंवा चोरीची नाही. पण थोडी विचित्रच आहे. चार वर्षांपूर्वी अंबरनाथमध्ये एका कंपनीत काम करणारी विवाहीता तिच्या मनमाड येथील माहेरुन घरी परतत असताना अचानक रेल्वेमधून गायब झाली होती. मनमाड पोलिसांनी तिचा खूप शोध घेतला. पण तिचा अजिबात तपास लागला नाही. दुसरीकडे ती काम करत असलेल्या कंपनीतील शाहबाज शेख नावाचा तरुणही अगदी त्याचवेळी गायब झाला होता. या दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता. पण अचानक चार वर्षांनी एक अशी घटना घडली की ते दोघं एकत्र पोलिसांना सापडले (Kalyan police found married woman and youth who missing from four years).

नातेवाईकांच्या मृत्यूनंतर आरोपी कल्याणला

अंबरनाथमध्ये एका कंपनीत काम करणारी विवाहिता आणि एक तरुण अचानक बेपत्ता झाले. विवाहितेचा शोध मनमाड रेल्वे पोलीस घेत होते. तर तरुणाचा शोध कल्याण पोलीस घेत होते. या दरम्यान दोन दिवसांपूर्वी तरुणाच्या एका नातेवाईचा मृत्यू झाला. चार वर्षांपासून बेपत्ता असलेला तरुण त्याच्यासोबत असलेल्या विवाहितेला घेऊन त्या नातेवाईकाच्या अत्यंविधीसाठी कल्याण पश्चिमेला आला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना ताब्यात घेतलं (Kalyan police found married woman and youth who missing from four years).

घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय?

अंबरनाथमध्ये एका कंपनीत कल्याण पश्चीमेतील रोहिदास वाडा परिसरात राहणारा शाहबाज शेख काम करीत होता. त्याच्यासोबत अंबरनाथमध्ये राहणारी सीमा कोष्टी काम करीत होती. अंबरनाथ आपल्या पतीसोबत राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या मनमाड येथील माहेरुन परत येत असताना ट्रेनमध्ये बसली आणि अचानक गायब झाली. ती हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी मनमाड पोलीस ठाण्यात केली.

काकांच्या मृत्यूची बातमी कळताच शाहबाज घरी दाखल

पोलिसांनी सीमा हिचा खूप शोध घेतला. या दरम्यान कल्याणमध्ये राहणारा शाहबाज शेख हा तरुणही अचानक बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली. या दोघांनी मनमाड आणि बाजारपेठचे पोलीस शोधत होते. दोन दिवसांपूर्वीच कल्याण पश्चीमेतील रोहिदास वाडा येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्यक्ती शाहबाज याचा काका होता. काकांच्या मृत्यूची बातमी कळताच शाहबाज घरी आला. त्याच्यासोबत सना नावाची त्याची पत्नी देखील आली होती. ही माहिती मिळताच बाजारपेठचे पोलीस कर्मचारी अत्तर सय्यद हे त्याठिकाणी पोहचले.

पोलिसांच्या चौकशीत सर्व उघड

पोलीस अधिकारी प्रमोद सानप यांनी शाहबाजला ताब्यात घेतले. जेव्हा शाहबाजसोबत असलेल्या पत्नीविषयी विचारणा केली असता तेव्हा हे उघडकीस आले की, सना हीच सीमा आहे जी मनमाडहून बेपत्ता झाली. हे दोघे 2017 साली बेपत्ता झाली होती. अखेर चार वर्षानंतर दोघांचा शोध लागला. हे दोघे लग्न करुन कोनगाव परिसरात राहत होते. प्रेम प्रकरणातून लग्न करुन हे दोघे पसार झाले. पोलीस त्यांचा शोधच घेत राहिले.

हेही वाचा : आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, मृतकासाठी रुग्णवाहिका मिळेना, कुटुंबियांनी दुचाकीवरुन घरी नेलं