आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, मृतकासाठी रुग्णवाहिका मिळेना, कुटुंबियांनी दुचाकीवरुन घरी नेलं

एकीकडे भारतात वैद्यकीय व्यवस्थेचे गोडवे गायले जात आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भलतीच काहीतरी व्यवस्था दिसून येत आहे (Madhya Pradesh Family not get ambulance to took dead body they used bike).

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, मृतकासाठी रुग्णवाहिका मिळेना, कुटुंबियांनी दुचाकीवरुन घरी नेलं
प्रतिकात्मक फोटो

भोपाळ : देश खूप प्रगत झाला आहे, कोरोना संकटात भारताने मोठी वैद्यकीय व्यवस्था उभारली, अशी भाषणं आपण ऐकली आहेत. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. एकीकडे भारतात वैद्यकीय व्यवस्थेचे गोडवे गायले जात आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भलतीच काहीतरी व्यवस्था दिसून येत आहे. कदाचित यंत्रणा खरंच उभी होतही असेल. पण काही ठिकाण याबाबत अपवाद असतील. अशीच अपवाद असलेली जागा म्हणजे मध्य प्रदेशच्या मंडला जिल्ह्यातील बम्हनी बंजर हे आरोग्य केंद्र. या रुग्णालयात दगावलेल्या रुग्णाला घरी घेऊन जाण्यासाठी साध्या रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था होऊ शकली नाही. या घटनेवर आता देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे (Madhya Pradesh Family not get ambulance to took dead body they used bike).

नेमकं काय घडलं?

मंडला जिल्ह्यात वास्तव्यास असलेले नागरिक चेतराम यादव यांच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने घराजवळ असलेल्या बम्हनी बंजर आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली असता चेतराम यांचा मृत्य झाल्याची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चेंतराम यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह घेऊन जाण्याची सूचना दिली. यावेळी चेतराम यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन द्यावी, अशी विनंती केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका नसल्याचे सांगितलं.

चेतराम यांचा मृतदेह थेट बाईकने घरी

चेतराम यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला प्रचंड विणवण्या केल्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर चेतराम यांचा मृतदेह थेट बाईकवर बसवून घेऊन जाण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून रुग्णालय प्रशासनावर टीका केली जात आहे.

रुग्णालय प्रशासनाची बाजू काय?

दरम्यान, या घटनेवर रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉ. के. सी. सरोते यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. याशिवाय जी रुग्णवाहिका उपलब्ध होती तिच्या चालकाला ताप आला होता. त्याने नुकतंच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यामुळे त्याला ताप आला होता. आम्ही मृतकासाठी दुसऱ्या खासगी वाहनाची व्यवस्था केली होती. पण ते रुग्णवाहिकेवरच अडून होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने दिली.

मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे दावे फेटाळले

मृतक चेतराम यांच्या मुलाने हे सगळे दावे फेटाळले आहेत. अशी कुठल्याही प्रकारच्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली नाही, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : प्रदीप शर्मांसह इतर आरोपींचे डीएनए नमुने जमा, पुराव्यांसोबत पडताळणी होणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI