प्रदीप शर्मांसह इतर आरोपींचे डीएनए नमुने जमा, पुराव्यांसोबत पडताळणी होणार

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा अटकेत असलेल्या सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं

प्रदीप शर्मांसह इतर आरोपींचे डीएनए नमुने जमा, पुराव्यांसोबत पडताळणी होणार
ठाणे नगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात प्रदीप शर्मानी जामीनअर्ज घेतला मागे

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने अटक केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) आणि इतर आरोपींचे डीएनए नमुने आज जमा करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA)असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए टेस्ट करुन पाहिले जाणार आहेत. डीएनए टेस्टसाठी एक टीम एनआयए कार्यालयात दाखल झाली होती. (NIA team collects Pradeep Sharma and other accuse DNA samples)

एनआयएच्या ताब्यात आणखी दोघे

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा अटकेत असलेल्या सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर आणखी दोघा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. एनआयए प्रदीप शर्मांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्याही मागावर असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारीच शर्मांना एनआयएने अटक केली होती.

NIA चा दावा काय?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.

आतापर्यंत किती जणांना बेड्या?

1. सचिन वाझे
2. विनायक शिंदे
3. रियाझ काझी
4. सुनील माने
5. नरेश गोर
6. संतोष शेलार
7. आनंद जाधव
8. प्रदीप शर्मा

संबंधित बातम्या :

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा

NIA ची सर्वात मोठी कारवाई, प्रदीप शर्मा यांना अटक, आतापर्यंत किती जणांना बेड्या?

(NIA team collects Pradeep Sharma and other accuse DNA samples)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI