Model Molestation : मॉडेलचा विनयभंग करणे महागात पडले, करणी सेनेच्या ‘या’ नेत्याला अटक

मॉडेलचे डिसेंबरमध्ये फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवून तिच्या नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांना अपमानास्पद आणि अश्लील संदेश पाठवल्याबाबत तिने पोलिसांशी संपर्क साधला होता. फेक अकाउंट बनवणारा तिच्या फॉलोअर्सना अश्लील मेसेजही पाठवत होता.

Model Molestation : मॉडेलचा विनयभंग करणे महागात पडले, करणी सेनेच्या या नेत्याला अटक
करणी सेनेचा सदस्य सुरजित सिंह राठोडला अटक
Image Credit source: Social
| Updated on: Jan 21, 2023 | 10:30 PM

मुंबई : मॉडेलची छेडछाड केल्याप्रकरणी करणी सेनेचा नेता सुरजित सिंह राठोड विरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगूर नगर पोलिसांनी कलम 354 (अ)(डी), 500, 509, 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राठोड हा अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचा सदस्य आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर अधिक तपास करत पोलिसांनी गुरुवारी रात्री सुरजित सिंह राठोडला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीची याआधीही काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

करणी सेनेचा नेता सुरजित सिंह याच्यावर एका मॉडेलने विनयभंग आणि छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार मॉडेलने बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी सुरजित सिंह विरोधात गुन्हा दाखल केला.

फेक अकाऊंट प्रकरणी मॉडेलने केली होती तक्रार

मॉडेलचे डिसेंबरमध्ये फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवून तिच्या नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांना अपमानास्पद आणि अश्लील संदेश पाठवल्याबाबत तिने पोलिसांशी संपर्क साधला होता. फेक अकाउंट बनवणारा तिच्या फॉलोअर्सना अश्लील मेसेजही पाठवत होता.

फेक अकाऊंट प्रकरणात राठोडचा सहभाग असल्याचे उघड

या प्रकरणात राठोडचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने तपासाच्या आधारे गुरुवारी रात्री करणी सेनेच्या नेत्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांना असे आढळून आले की सुरजीत सिंग राठोडने मॉडेलला प्रपोज केले होते आणि तिने त्याला नकार दिल्यावर राठोडने तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली आणि तिचा छळ सुरू केला.

सुरजित सिंह राठोड हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही तो प्रकाशझोतात आला होता. अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचा सदस्य असलेला सुरजित सिंह राठोड हा स्वतःला सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगतो.