Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांच्या जामिनाला केतकी चितळेच्या वकिलांचा विरोध

| Updated on: Jun 06, 2022 | 7:35 PM

केतकीवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आदिती नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचाही आरोप देशपांडे आणि उपाध्याय यांनी केला आहे. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या 12 नावांमध्ये हल्लेखोर आदिती नलावडे यांच्या नावाचाही समावेश असल्याचे केतकीच्या वकिलांनी नमूद केले.

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांच्या जामिनाला केतकी चितळेच्या वकिलांचा विरोध
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us on

मुंबई : शरद पवारांबाबत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) केल्यानंतर सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वकिलांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनाला विरोध केला आहे. अनिल देशमुखांचा जामिन अर्ज (Bail Application) फेटाळण्यासाठी विनंती अर्ज योगेश देशपांडे आणि घनश्याम उपाध्याय यांच्या वतीने सीबीआय विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे. राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून अनिल देशमुख यांनी एक दिवसाचा जामीन मागितला आहे. जर देशुमख फरार झाले तर त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. ‘अनिल देशमुख मिळून येत नाहीत’ असा अहवाल अदृश्य हाताच्या सांगण्यावरुन सादर करतील याची केतकी प्रकरणावरुन खात्री पटते, असेही केतकीचे वकिल म्हणाले.

केतकीवरील हल्ल्या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ केल्याचा दावा

फेसबुकवरील एका कवितेबद्दल केतकी चितळेवर 22 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणातील तक्रारदार एका बलाढ्य राजकारण्याचे समर्थक आहेत. सर्व तक्रारीतील मजकूर बराच सारखा आणि एकाच व्यक्तीने लिहून दिल्यासारखा वाटतोय, असा आरोप देशपांडे आणि उपाध्याय यांनी केला आहे. केतळी चितळेला 14 मे 2022 रोजी कळंबोली पोलिसांनी बोलावून घेतले. त्यानंतर तेथून कळवा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. कळवा पोलीस ठाण्यात आणण्यासाठी तिला गाडीत आणत असतानाच तिच्यावर हल्ला झाला. हा हल्ला आदिती नलावडे आणि अन्य गुंडांनी केला होता. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली होती. पोलीस स्टेशन परिसरात जमावबंदी असतानाही हा जमाव जमला होता. केतकीला मारहाण आणि विनयभंग करण्यात आला. केतकीवरील हल्ल्या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा दावा केतकीच्या वकिलांनी केला आहे.

केतकीवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आदिती नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचाही आरोप देशपांडे आणि उपाध्याय यांनी केला आहे. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या 12 नावांमध्ये हल्लेखोर आदिती नलावडे यांच्या नावाचाही समावेश असल्याचे केतकीच्या वकिलांनी नमूद केले. यामुळे सीबीआय सारख्या यंत्रणेकडून बलाढ्य राजकारण्यांचा अदृश्य हात उघड करावा यासाठी याचिका दाखल करण्यात येत आहे. (Ketki Chitales lawyers oppose former Home Minister Anil Deshmukhs bail)

हे सुद्धा वाचा