CCTV Video : भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेकडून मंदिरात चोरी, हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना सीसीटीव्हीत कैद

मोहाडी शहरातील बायपास रोडवर श्रीराम मंदिर आहे. याच मंदिरात हनुमानाचीही मूर्ती आहे. सोमवारी सकाळी 7.55 वाजण्याच्या सुमारास पुष्पा नामक ही महिला हनुमान मंदिरात आली. यावेळी मंदिरात पुजारी किंवा भाविक कुणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत पुष्पाने हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा काढून पोबारा केला.

CCTV Video : भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेकडून मंदिरात चोरी, हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना सीसीटीव्हीत कैद
भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेकडून मंदिरात चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 5:05 PM

भंडारा : मानसिक रुग्न महिलेने हनुमानाच्या मंदिरात चोरी (Theft) केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे. या महिलेने हनुमानाचा चांदीचा डोळा (Silver Eye) चोरुन नेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीची शहरात ही घटना घडली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुष्पा असे या चोरी करणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे नाव आहे. चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार नोंद करण्यात आली नाही.

चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मोहाडी शहरातील बायपास रोडवर श्रीराम मंदिर आहे. याच मंदिरात हनुमानाचीही मूर्ती आहे. सोमवारी सकाळी 7.55 वाजण्याच्या सुमारास पुष्पा नामक ही महिला हनुमान मंदिरात आली. यावेळी मंदिरात पुजारी किंवा भाविक कुणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत पुष्पाने हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा काढून पोबारा केला. काही वेळाने मंदिराचे पुजारी जेव्हा मंदिरात आले तेव्हा हनुमानाच्या मूर्तीवर चांदीचा डोळा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेने हा डोळा चोरल्याचे उघडकीस आले. चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोहरा गोदामातून 64 क्विंटल धान लंपास

सेवा सहकारी संस्थेच्या गोदामातून शेतकऱ्यांचा 64 क्विंटल धान चोरीस जाण्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पोहरा येथे घडली आहे. सोसायटीचे अध्यक्ष विष्णू दशरथ गिरीपुंजे यांच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोहरा येथील शासकीय गोदामात शेतकऱ्यांकडून गोळा केलेले 3280 क्विंटल धान साठवून ठेवण्यात आले होते. ग्रेडर व हमाल याठिकाणी गेले असता त्यांना शटर तुटलेले दिसले. आत जाऊन बघितले असता 64 क्विंटल धानाचे कट्टे चोरट्याने लंपास केल्याचे पुढे आले. (Hanumans silver eye was stolen from a mentally ill woman in the temple in bhandara)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.