पोलिसांच्या तावडीतून मुलाचे अपहरण करणारा आरोपी पळाला, आता मुलाचे दोन तुकडे मिळाले

| Updated on: Mar 06, 2024 | 10:13 AM

Mumbai Crime News | मुंबईत मुलाचे शीर कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. 28 जानेवारी रोजी अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांना दिले होते. परंतु पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार झाला.

पोलिसांच्या तावडीतून मुलाचे अपहरण करणारा आरोपी पळाला, आता मुलाचे दोन तुकडे मिळाले
Follow us on

मुंबई | दि. 6 मार्च 2024 : मुंबईतून धक्कादायक बातमी आली आहे. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाची 28 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. लोकांनी संशयित आरोपीला पकडून पोलिसांकडे दिले. परंतु संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. आता त्या मुलाचा मृतदेहच सापडला आहे. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलाचे शीर कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. आता या प्रकरणात ज्या पीएसआयने आरोपीला तोंड धुण्यास पाठवले तो ही चौकशीच्या फेऱ्यात आला आहे. कारण त्या पीएसआयाने आरोपीला पाठवताना सोबत पोलीस कर्मचारी पाठवला नाही.

काय आहे प्रकार

वडाळा पूर्वेकडील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या सहावीमध्ये शिकणाऱ्या बारा वर्षांच्या मुलाचे 28 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. सर्वत्र शोध घेऊनही मुलगा सापडला नाही. यामुळे मुलाच्या वडिलांनी वडाळा टी टी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडाळामधील शांतीनगर झोपडपट्टीत मुलास बिपुल शिकारी या आरोपीने हॉटेलमध्ये बिर्याणी खायला नेण्याच्या बहाण्याने नेले होते. लोकांनी हा प्रकार समजला. त्यानंतर लोकांनी आरोपीला शोधून पोलीस ठाण्यात आणले. आरोपीला पकडल्यावर लोकांनी मारहाण केली होती.

मारहाणीमुळे आरोपीच्या डोक्यात असलेल्या एका जखमेतून रक्तस्राव होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला तोंड धुण्यास पाठवले. त्यावेळी सोबत पोलीस पाठवला नाही. यामुळे संधी साधून आरोपी फरार झाला. वडाळा टी टी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुलाचा मृतदेह सापडला

मंगळवारी त्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तसेच त्याचा शिर वडाळ्यातील खाडीजवळ मिळाला. मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट, हातातील कडे यामुळे त्याची ओळख पाठली. पोलिसांनी शिकारी याचा शोध सुरु केला आहे. आता त्या आरोपीला तोंड धुण्यासाठी पाठवलेल्या सबंधित पीएसआयची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

आरोपी पश्चिम बंगालमधील

आरोपी बिपुल शिकारी हा पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील आहे. त्याला 2012 मध्ये केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात पश्चिम बंगालमधील बर्टोला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 2016 मध्ये त्याला जन्मठेप झाली. कोरोना काळात तो पॅरोलवर बाहेर पडला. त्यानंतर मुंबईत आला आणि मुलांची तस्करी करु लागल्याचे म्हटले जात आहे.