जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

| Updated on: Mar 11, 2022 | 2:33 PM

4 डिसेंबर 2010 ला दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले होते. जुन्या वादातून अशोक पाटील यांनी हा हल्ला केल्या असल्याचे उघड झाले होते. 12 वर्षानंतर या प्रकरणात आरोपी संजय पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा
दोन भावांच्या हत्या प्रकरणातील आरोपी
Follow us on

कल्याण : जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला होता. यामध्ये दोन भावांचा मृत्यू झालेला, तर एक भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता. 12 वर्षानंतर या प्रकरणात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हल्लेखोर संजय पाटील याला जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा कल्याण कोर्टाने सुनावली आहे. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने आरोप पत्र दाखल केल्याने आरोपीला शिक्षा मिळाली आहे. 3 डिसेंबर 2010 च्या रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील रामदास वाडी परिसरात रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

काय आहे प्रकरण?

रामवाडी परिसरात राहणाऱ्या देवकर कुटुंबातील तीन सख्खे भाऊ अशोक देवकर ,कृष्णा देवकर आणि रामदास देवकर हे रस्त्यावर गप्पा मारत फिरत होते. याच वेळी दोन जण बाईक वर आले. मनोज खांडगे नावाचा व्यक्ती बाईक चालवत होता तर संजय पाटील नावाचा व्यक्ती पाठीमागे बसला होता. संजय पाटील याच्या हातात धारदार शस्त्र होते. बाईकवरून खाली उतरताच संजय पाटील याने देवकर बंधूंवर हल्ला केला.

नेमकं काय घडलं?

आधी अशोक देवकर यांच्यावर हल्ला केला. नंतर कृष्णा देवकर याच्यावर हल्ला केला. तर मध्यस्थी करण्यास आलेल्या रामदास याच्यावर देखील त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अशोक आणि कृष्णा देवकर यांचा मृत्यू झाला, तर रामदास याचा जीव बचावला.

4 डिसेंबर 2010 ला दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले होते. जुन्या वादातून अशोक पाटील यांनी हा हल्ला केल्या असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करत दोषारोप पत्र कल्याण कोर्टात पाठवले.

बारा वर्षांनी शिक्षा

या घटनेच्या दोन वर्षानंतर मनोज खांडगेचा मृत्यू झाला होता.अखेर 12 वर्षानंतर या प्रकरणात आरोपी संजय पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला

बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या

 साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न