AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत नवविवाहितेच्या घरी घुसून गँगरेप, पोलिसांनी 102 सीसीटीव्ही खंगाळले आणि आरोपी भावंडं सापडली

11 मे रोजी तक्रारदार महिला घरात झोपली होती आणि तिचे सासरे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी दरवाजा उचकटून दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून तिला बांधले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मुंबईत नवविवाहितेच्या घरी घुसून गँगरेप, पोलिसांनी 102 सीसीटीव्ही खंगाळले आणि आरोपी भावंडं सापडली
मुंबईत महिलेवर गँगरेपImage Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 17, 2022 | 3:59 PM
Share

मुंबई : नवविवाहित महिलेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी मुंबईत दोघा भावांना अटक केली आहे. दोघा आरोपींपैकी एक किशोरवयीन (टीनएजर) आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात पहाटेच्या सुमारास धारावीतील एका घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार (Mumbai Crime News) केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे भविष्यात तिला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याच्या उद्देशाने दोघांनीही हे कृत्य चित्रित केले होते. पीडितेच्या घरातून पळून जाण्यापूर्वी आरोपींपैकी एकाने परिसरातील एका स्टेशनरी दुकानदाराला हात केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या छोट्याशा क्लूमुळेच पोलिसांना आरोपींना पकडण्यात मदत झाली.

काय आहे प्रकरण?

अनिल जुगदेव चौहान (19 वर्ष) आणि नीलेश जुगदेव चौहान (20) या आरोपींना सामूहिक बलात्कार, महिलेचा विनयभंग करणे, धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर नुकतेच धारावीत राहायला गेलेल्या पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. 11 मे रोजी ती घरात झोपली होती आणि तिचे सासरे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी दरवाजा उचकटून दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून तिला बांधले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

ब्लॅकमेलिंगसाठी व्हिडीओ शूट

धक्कादायक म्हणजे त्यांनी मोबाईल वापरुन अत्याचाराचे चित्रीकरणही केले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे सासरे परत येण्यापूर्वीच दोन्ही आरोपी पळून गेले होते. तक्रार दाखल होताच, पोलिस उपायुक्त (झोन 5) प्रणय अशोक यांनी आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक बळवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले.

पोलिसांनी तपास कसा केला?

“कोणताही सुगावा न लागल्याने आम्ही जवळपास 102 सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. आमच्या अधिकाऱ्याला एक छोटासा क्लू मिळाला. त्याने एका आरोपीला दुकानदाराकडे पाहून हात हलवताना पाहिले. चौकशी केल्यावर दुकानदाराने पोलिसांना सांगितले की फुटेजमधील व्यक्ती अनिल चौहान आहे. तो त्याच्या दुकानात प्रिंटर कलर टोनरचा पुरवठा करतो” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

याआधारे पोलिसांनी अनिलला उचलले. त्याने सुरुवातीला कुठलेही दुष्कृत्य केल्याचा इन्कार केला. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या पुराव्यासह आणि कॉल डिटेल रिपोर्ट्ससह त्याला बोलते केले, तेव्हा त्याने सामूहिक बलात्काराची कबुली दिली. या दृष्कृत्यातील साथीदार त्याचा भाऊ नीलेश असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

महिलेला पाहून मोहित

पोलिसांनी सांगितले की दोघे भाऊ काही वर्षांपूर्वीपर्यंत याच परिसरात राहत होते आणि नुकतेच ते कुटुंबासह विलेपार्ले येथे राहायला गेले होते. अनिल मात्र प्रिंटर टोनर पुरवण्यासाठी वारंवार धारावीला जात असे. पीडित महिलेला पाहून अनिलची मती फिरली आणि त्याने आपल्या भावासोबत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कट रचला होता. त्यांनी या कृत्याचे चित्रीकरण करण्याचे ठरवले, जेणेकरून ते नंतर ब्लॅकमेल करु शकतील आणि तिला आपल्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडू शकतील.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींना त्या परिसराची इत्यंभूत माहिती होतीच, तर महिलेच्या कुटुंबालाही ओळखत होते. त्यांना माहित होते की महिलेची सासू तिच्या गावी गेली आहे आणि तिचा नवरा आणि सासरे बाहेर पडल्यावर ती घरी एकटी असेल, असे डीसीपी अशोक यांनी सांगितले

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.