मूल होत नसल्याने भाचीला पळवलं, मावशीसह नवऱ्यालाही अटक

| Updated on: Dec 27, 2021 | 10:07 AM

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमध्ये संबंधित कुटुंब राहते. त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यावेळी रिक्षात बसलेल्या महिला-पुरुषाच्या जोडगोळीने मुलीला नेल्याची माहिती पोलिसांना समजली.

मूल होत नसल्याने भाचीला पळवलं, मावशीसह नवऱ्यालाही अटक
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us on

उल्हासनगर : मूल होत नसल्याने मावशीनेच आपल्या भाचीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हानसनगर शहरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सहा वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण प्रकरणी आरोपी मावशी आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांना अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तेव्हा लेकीला सुखरुप पाहून पालकांना अश्रू अनावर झाले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमध्ये संबंधित कुटुंब राहते. त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखा करत होती. यावेळी रिक्षात बसलेल्या महिला-पुरुषाच्या जोडगोळीने मुलीला नेल्याची माहिती पोलिसांना समजली. तपासाच्या आधारे अंबरनाथ डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या गणेश मुदलियार आणि त्याची पत्नी सरला मुदलियार यांची पोलिसांनी धरपकड केली.

मूल नसल्याने भाचीचं अपहरण

मुदलियार दाम्पत्याच्या घरातून सहा वर्षांच्या चिमुरडीची सुटका करण्यात आली. मूल होत नसल्याने सरलाने बहिणीच्या मुलीला पळवल्याचं तपासात समोर आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला. भाचीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी मावशी आणि तिचा पती अशा दोघांनाही अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

वाळूचोरी करताना ट्रॉली उलटून दोघांचा मृत्यू, वर्ध्यात नगरसेवकाला अटक

शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू

ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद