ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद

सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी घालत कोयता आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनी ट्रकला अडवले. तसेच ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले. ट्रकचालक मनोज बडवाईक याच्याकडे असलेली 17 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावला

ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद
भंडाऱ्यात ट्रकचालकाची लूट
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 9:38 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही९ मराठी, भंडारा : तब्बल तीन महिन्यांपूर्वी कोयता आणि चाकूच्या धाकावर एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. या प्रकरणी शेर ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम (वय 24 वर्ष, रा. नेहरु वॉर्ड वरठी) आणि एका अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

घटनेच्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 2021 रोजी मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील रहिवासी असलेले मनोज सुरसराम बडवाईक हे ट्रकमधील गिट्टी रिकामी करण्यासाठी पांढराबोडी येथे आले होते. याचवेळी शेरु उर्फ हर्षद मेश्राम आणि अल्पवयीन मुलगा बाईकवर आले.

सिनेस्टाईल लूट

सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी घालत कोयता आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनी ट्रकला अडवले. तसेच ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले. ट्रकचालक मनोज बडवाईक याच्याकडे असलेली 17 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्यांनी पळ काढला.

या प्रकरणी बडवाईक यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिस कामाला लागले. शेरू ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असावा, असा कयास बांधत त्याच वेळेपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेरूच्या मागावर होते.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे कारवाई करत पहाटेच्या सुमारास शेरुला ताब्यात घेतले आहे. त्याला विचारणा केली असता त्याने एका अल्पवयीन मुलाच्या सोबतीने लूट केल्याचे कबूल केले आहे. भंडारा पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

वाळूचोरी करताना ट्रॉली उलटून दोघांचा मृत्यू, वर्ध्यात नगरसेवकाला अटक

शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू

आठवडाभर बेपत्ता, चिमुकलीचा मृतदेह घरात पाण्याच्या टाकीत सापडला, तिघे नातेवाईक ताब्यात

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.